सध्या जगामध्ये ओमायक्रॉनने थैमान घातलं आहे. भारतामध्येही करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. मात्र एकीकडे या नवीन विषाणूचा फैलाव होत असतानाच फ्रान्स आणि जगातील इतर काही देशांमध्येही करोनाचे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत. २०१९ साली पहिल्यांदा चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये करोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट आढळून आलेत. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये उत्पत्ती झालेल्या ओमायक्रॉनबद्दल संभ्रम कायम असतानाच दुसरीकडे नायझेरियामध्ये नवीन व्हेरिएंट सापडल्याचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. विशेष म्हणजे हे ट्विट या बातमीसाठी व्हायरल झालं नसून त्यावर आलेल्या रिप्लायमुळे व्हायरल झालंय. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनीही या रिप्लायशी आपण सहमत असल्याचं म्हटलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये एका व्यक्तीने नायझेरियन व्हेरिएंटबद्दलची माहिती दिलीय. “नुकतीच समोर आलेली बातमी : नायझेरियामध्ये करोनाचा नवीन स्ट्रेन आढळून आळाय. हा स्ट्रेन युकेमध्ये (युनायटेड किंग्डम) आढळलेल्या व्हेरिएंटहून वेगळाय,” असं या व्यक्तीने म्हटलंय.

Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Anand Mahindra reacts to parent hack video
Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

याच पोस्टवर सुशील यादव नावाच्या व्यक्तीने अगदीच मजेदार रिप्लाय दिलाय. “प्रत्येक देशाने आपआपला एक एक व्हेरिएंट काढावा. वर्षाच्या शेवटी आपण करोनाव्हायरल विश्वचषक स्पर्धा भरवूयात,” असा उपहासात्मक टोला यादव नावाच्या या व्यक्तीने लगावलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर या संवादाचा फोटो व्हायरल होतोय. हाच फोटो आनंद महिंद्रांनाही सिग्नल अ‍ॅपवर मिळाला. त्यांनी तो इंडियन ह्युमर म्हणजेच भारतीय विनोद या हॅशटॅगसहीत ट्विटरवरुन शेअऱ केलाय. “मझा या विचाराला पाठिंबा आहे,” असं महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये हा मजेदार फोटो शेअर करताना म्हटलंय. म्हणजेच प्रत्येक देशाने करोनाचा एक एक व्हेरिएंट काढावा आणि वर्षाच्या शेवटी करोना विश्वचषक स्पर्धा भरवायची या उपहात्मक मागणीला आपण पाठिंबा देत आहोत असच महिंद्रा यांनी जाहीर केलंय.

खरं तर हा सारा संवाद आणि नायझेरियन व्हेरिएंट हे २०२० च्या शेवटच्या महिन्यामधील व्हायरल बातमीसंदर्भात आहे. मात्र सध्या ओमायक्रॉन आणि फ्रान्समध्ये आढळून आलेल्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाल्याचं पहायसला मिळतंय.

Story img Loader