सध्या जगामध्ये ओमायक्रॉनने थैमान घातलं आहे. भारतामध्येही करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. मात्र एकीकडे या नवीन विषाणूचा फैलाव होत असतानाच फ्रान्स आणि जगातील इतर काही देशांमध्येही करोनाचे नवीन व्हेरिएंट आढळून आले आहेत. २०१९ साली पहिल्यांदा चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये करोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट आढळून आलेत. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये उत्पत्ती झालेल्या ओमायक्रॉनबद्दल संभ्रम कायम असतानाच दुसरीकडे नायझेरियामध्ये नवीन व्हेरिएंट सापडल्याचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालंय. विशेष म्हणजे हे ट्विट या बातमीसाठी व्हायरल झालं नसून त्यावर आलेल्या रिप्लायमुळे व्हायरल झालंय. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रांनीही या रिप्लायशी आपण सहमत असल्याचं म्हटलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा