मॅट एलिस या ब्रिटीश पब उत्साही व्यक्तीने असा दावा केला आहे की मद्यधुंद न होता जवळपास ९ तासात ५१ पबला भेट देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा प्रयन्त केला आहे. मॅट एलिस हा सेंट निओट्स, केंब्रिजशायरचा रहिवासी आहे.ब्रिटिश व्यक्तीने दावा केला की त्याने ८ तास, ५२ मिनिटे आणि ३७ सेकंदात एकूण ५१ व्यवसायांना (पब्सना) भेट दिली. मॅटने उघड केले की हे आव्हान स्वीकारण्यामागचे कारण कोविड -१९ साथीच्या आजाराने प्रभावित पब आणि नाईटक्लबच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणे होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये हा रेकॉर्डबनण्याची शक्यता आहे.

बीबीसीच्या अहवालानुसार, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळवण्यासाठी मॅटला प्रत्येक पब/ नाईट क्लबमध्ये किमान १२५ मिली प्यावे लागणार होते.

(हे ही वाचा: Viral Video: शाळेचा मुख्याध्यापक कोण होणार? शिक्षकांमध्ये अक्षरश: झाली हाणामारी, बघा व्हिडीओ)

“मला जबाबदारीने वागायचे होते आणि माझ्या आरोग्यासाठी जास्त मद्यपान केले नाही. कदाचित कित्येक वर्षांपूर्वी मी ५१ अल्कोहोलयुक्त पेये बनवली असती. पण आता नाही, ”मॅट म्हणाला. त्याने जवळ जवळ ६.३ लिटर द्रव सेवन केले होते.

( हे ही वाचा: उडण्यासाठी चिमुकल्याचा अनोखा प्रयोग; IAS अधिकाऱ्यांनी केला व्हिडीओ पोस्ट )

“मी इतके पित होतो की माझ्या पोटात कोणतेही अन्न बसत नव्हते. रात्रीच्या वेळी मी सहा किंवा सात वेळा लघव्हीसाठी गेलो, “तो म्हणाला.

४८ वर्षीय ब्रिटिश माणूस सेंट निओट्समध्ये वाइन व्यापारी आहे. ते म्हणाले की ते पबचे मोठे चाहते आहेत आणि त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान आहे. मॅटच्या पब क्रॉलमधील माहिती आणि पुरावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सादर करण्यात आले आहेत आणि अधिकृत प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे. हे लक्षात घेतले जाऊ शकते की जर मॅटच्या रेकॉर्डची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे पडताळणी केली गेली तर तो असा पराक्रम गाजवणारा पहिला व्यक्ती असू शकतो.

Story img Loader