ऐकावे ते नवलच! आजच्या जगात विज्ञान इतके पुढे गेले आहे की, ज्यामुळे ‘काहीही घडू शकते’ यावर विश्वास यावर विश्वास बसू लागला आहे. अवघ्या ६ महिन्याच्या बाळावर पहिल्यांदाच एक ऐतिहासिक प्रयोग यशस्वी झाला आहे. अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत सहा महिन्याच्या बाळामध्ये ह्रदय आणि इम्यून ग्लॅंड असे दोन अवयव यशस्वीरित्या बसवण्यात आले. ह्रदयावरील उपचारांमध्ये अतिशय कठीण व गुंतागुंतीची समजली जाणारी ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीरित्या करण्यात आली. एकाच वेळी ह्रदय आणि इम्यून ग्लॅंड बसवण्यासाठीची ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली आहे. त्यामूळे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

ईस्टन असं या सहा महिन्याच्या बाळाचं नाव आहे. या बाळाला शरीरात रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी ह्रदय आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्यून ग्लॅंड या ग्रंथींचं ट्रान्सप्लांट करण्याची आवश्यकता होती. अवघ्या या सहा महिन्याच्या बाळावर एकाच वेळी दोन वेगवेगळे ट्रान्सप्लांट करण्याच्या शस्त्रक्रियेचं मोठं आव्हानच होतं. पहिल्यांदाच एकाच वेळी दोन ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल

ड्यूक यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील पीडियाट्रिक कार्डिएक सर्जरीचे प्रमुख डॉ. जोसेफ डब्ल्यू तुरेक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रक्रिया भविष्यात सॉलिड ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या पद्धतीत बदल घडवून आणणार आहे. हार्ट ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया इतकी गुंतागुंतीची असते की ती यशस्वी झाली तरी कधी कधी शरीरातील प्रतिरोधक क्षमता त्या नवीन ह्रदयाचा स्वीकार करत नाही, त्यामूळे ही शस्त्रक्रिया कधी कधी अयशस्वी सुद्धा ठरत असते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : …अन् पोपटाने त्याच्या चोचीच्या मदतीने फडकावला युक्रेनचा झेंडा

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीचा डान्स पाहून भावूक झाला नवरदेव, लग्नाला आलेले पाहुणेही बघतच राहिले

डॉ. जोसेफ यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगितले की, जेव्हा एखादा बाह्य अवयव दुसऱ्याच्या शरीरात प्रत्यारोपित केला जातो, तेव्हा प्रत्यारोपण प्राप्तकर्त्याची प्रतिकारशक्ती त्या अवयवाच्या पेशी आणि ऊतींना टार्गेट करू लागतात. रोगप्रतिकारक शक्ती बाह्य अवयवावर हल्ला करते जेणेकरून अवयव काम करणे थांबवतात. यामुळे रुग्णाची स्थिती बिघडते. तो जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करू लागतो.

म्हणूनच अवयव देणारा आणि घेणारा दोघांनाही प्रतिकारशक्ती मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून अवयव वाया जाणार नाहीत. अशा शस्त्रक्रियांमध्ये डॉक्टर अनेकदा इम्युनोसप्रेसिव्ह औषधे देतात. जेणेकरून शरीराची प्रतिकारशक्ती शस्त्रक्रियेदरम्यान किंवा नंतर लगेच बाहेरून येणारा अवयव नाकारू शकत नाही. ही औषधे दोन वेगवेगळ्या टप्प्यात दिली जातात. यातील काही इतके धोकादायक असतात की त्यांचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणजेच ज्या लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारी औषधे घेतली आहेत किंवा या समस्येचा सामना करत आहेत, त्यांना आजार होण्यासाठी वेळ लागत नाही.

डॉ. जोसेफ यांनी सांगितलं की, कोणत्याही प्रत्यारोपित अवयवाचे वय नवीन शरीरात फक्त १० ते १५ वर्षे असतं. म्हणून आम्ही एक नवीन पर्याय घेऊन आलो. ईस्टन हे सहा महिन्याचं बाळ कमकुवत हृदयाने जन्माला आलं होतं. यासोबतच त्याच्या रोगप्रतिकारक ग्रंथी थायमस इम्यून ग्रंथीमध्येही समस्या निर्माण झाली होती. ही ग्रंथी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणाऱ्या टी-सेल्सला जन्म देते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘छोरी पटाता है’ च्या रिमिक्स व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलाय का?

डॉ. जोसेफ आणि त्यांच्या टीमने कोणत्याही प्रकारची इम्युनोसप्रेसिव औषधे न देता रक्तदात्याच्या शरीरातून हृदयसोबतच थायमसच्या नव्या ग्रंथी देखील प्रत्यारोपित करण्याची योजना बनवली. म्हणजेच ज्या शरीरातून हृदय येत आहे, त्याच शरीरातून रोगप्रतिकारशक्ती विकसित करणारी ग्रंथी सुद्धा प्रत्यारोपित केल्या तर प्राप्तकर्त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती नवीन हृदय सहज स्वीकारू शकेल. त्याला विरोध करणार नाही.

जर थायमस यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले गेले तर ते डोनर हृदयाला ओळखू लागतो, कारण ते ह्रदय देखील त्याच शरीरातून आलेले असते. याच कारणामुळे ईस्टन या सहा महिन्याच्या बाळाला औषधांची गरज पडली नाही. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांच्या पथकाने प्रथम एफडीएकडे परवानगी मागितली. ईस्टनला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नवीन हृदय आणि थायमस ग्रंथी मिळाली. या शस्त्रक्रियेची पद्धत सुद्धा ड्यूक विद्यापीठातूनच विकसीत झाली आहे. थायमसचे एका विशिष्ट पद्धतीने संवर्धन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली होती.

आणखी वाचा : शेवटी आई ही आईच असते, हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही भावूक व्हाल

सहा महिन्याच्या बाळावर ही पहिल्यांदाच केली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. नंतर त्याला काही इम्युनोसप्रेसिव्ह औषधे दिली गेली पण काही दिवसांनी त्या सुद्धा बंद करण्यात आल्या आहेत. कारण ईस्टनच्या शरीरात नवीन ह्रदय बसवल्यानंतर कोणताही विरोध झाला नाही. ईस्टनच्या शरीराने नवीन ह्रदय आणि इम्यून ग्लॅंडचा स्वीकार केलेला आहे.

ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख एलेन डी. कर्क यांनी सांगितले की, ही पूर्णपणे नवीन प्रकारची शस्त्रक्रिया आहे. मुलाला वाचवण्यासोबतच आम्ही वैद्यकीय शास्त्रात प्रत्यारोपणाची नवीन पद्धत शोधून काढली आहे. जर मूल निरोगी राहिले, तर भविष्यात आपण ही पद्धत इतर लोकांवर वापरून त्यांचे प्राण वाचवू शकतो. त्यांना नवजीवन देऊ शकतो.