Twins Arrive Minutes Apar but a Year Away : प्रत्येक आईवडीलांसाठी आपल्या बाळाचा जन्म हा आयुष्यातील अत्यंत खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. जुळ्या बाळांच्या जन्मावेळी हा आनंद द्विगुणीत होतो. सध्या एका जोडप्याच्या जुळ्या मुलांच्या जन्मावेळी एक दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. सोशल मीडियावर या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. न्यू जर्सी येथील एका जोडप्याने त्यांच्या जुळ्या मुलांना दोन वेगवेगळ्या दिवशी नव्हे तर दोन वेगवेगळ्या वर्षांत जन्म दिला आहे. या जोडप्याच्या जुळ्या मुलांच्या जन्मवेळेत अवघ्या काही मिनिटांचे अंतर आहे पण तरीही दोघांमध्ये वर्षानुसार एका वर्षाचे अंतर आहे. त्याचे झाले असे की, एका बाळाचा जन्म ३१ डिसेंबरला २०२३ आणि तर दुसऱ्या बाळाचा जन्म १ जानेवारी २०२४ला झाला आहे. जुने वर्ष संपताना आणि नवीन वर्ष संपताना जन्मलेल्या मुलांचा जन्म हा एक दुर्मिळ योगायोग मानला जात आहे. चला सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एझरा हम्फ्रेने (Ezra Humphrey) याचा जन्म ३१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११.४८ वाजता झाला. विशेष गोष्ट म्हणजे त्याच दिवशी त्याच्या वडीलांचाही जन्मदिवस आहे. त्याचे वडील बिली हम्फ्रे यांनी त्याच दिवशी आपला बिली हम्फ्रे ३६ वा जन्मदिवस साजरा केला. एझराचा आणि त्याच्या वडिलांचा वाढदिवस एकाच दिवशी आला आहे हाही एक योगायोगच आहे. एझराच्या जन्मानंतर अवघ्या एका तासापेक्षा कमी वेळात १ जानेवारी रोजी पहाटे १२.२८ वाजता इझेकिएलचा जन्म झाला. इझेकिएलाच्या जन्मावेळी नववर्ष सुरु झाल्याने हा दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. त्यामुळे दोघांच्या जन्मामध्ये वर्षानुसार एका वर्षाचा फरक दिसत आहे.

हेही वाचा – रात्री उशीरा पार्टी करण्यासाठी कर्मचाऱ्याने बॉसला मागितली सुट्टी! Whatsapp चॅट झाले व्हायरल; नेटकरी म्हणाले, ”बॉस..

पालकांनी आनंद व्यक्त केला
जुळ्या मुलांच्या वडिलांनी गुड मॉर्निंग अमेरिकेशी संवाद साधताना, “त्याच्या वाढदिवसाला किमान एक मुलाचा जन्म झाल्याची विशेष भेट लक्षात घेऊन आनंद व्यक्त केला. तसेच जुळ्या मुलांची आई, इव्ह हम्फ्रेने (Eve Humphrey) आपल्या नवजात मुलांबद्दलचा उत्साह साजरा करताना इंस्टाग्रामवर लिहिले की, ” ते खूप खास आहेत, इतके की ते जुळे असूनही एकाच वर्षात जन्मले नाहीत.”

हेही वाचा – Video : छत्रपती संभाजीनगरच्या लेकीने चालवली जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस! कल्पना धनवातने मिळवला मान

नेटकऱ्यानी केला शुभेच्छांचा वर्षाव
या जोडप्याच्या दुर्मिळ योगायोगाने जन्मलेल्या जुळ्या मुलांचा किस्सा सध्या चर्चेत आहे. लोकांनी या जोडप्याला मुलांच्या जन्मासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत तसेच हा योगायोग दुर्मिळ आणि कमाल असल्याचे सांगत आहे. कुटुंबाने जुळ्या मुलांच्या जन्माचा आनंद साजरा केलाच पण त्याबरोबर दोन वेगवेगळ्या वर्षी जन्मलेल्या या मुलांना अत्यंत खास आणि वेगळे असल्याचे मानत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New jersey twins arrive minutes apart but a year away happy couple share photo snk