New maruti suzuki dzire: मारुती सुझुकीची नवीन फोर्थ-जनरेशन डिझायरची प्री-बुकिंग सुरू झाली आहे, जी ११ नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. ही नवीन डिझायर अधिकृत मारुती सुझुकी वेबसाइट किंवा मारुती सुझुकी एरिना शोरूमवर ११,००० रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते. डिझायर ही बाजारात सर्वाधिक विकली जाणारी सेडान आहे.

आज, मारुती सुझुकीने अधिकृतपणे सेडानसाठी बुकिंगची घोषणा केली आणि त्यानंतर व्हेरिएंटचे डिटेल्सदेखील समोर आले आहेत. नवीन मारुती सुझुकी डिझायर चार प्रकारांमध्ये उपलब्ध असेल आणि त्यात सेगमेंट-फर्स्ट फीचर्स मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Manoj Jarange Patil Nomination Back Decision Impact on Eknath Shinde Shivsena
Manoj Jarange Patil : माघार घेताना जरांगे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना धक्का
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट

हेही वाचा… नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स, दमदार परफॉरमन्स अन् किंमत…

मारुती सुझुकी डिझायरचे व्हेरियंट्स आणि फीचर्स

नवीन मारुती सुझुकी डिझायर लाँच झाल्यावर चार व्हेरियंट्समध्ये उपलब्ध होईल – LXi, VXi, ZXi आणि ZXi+. चारही व्हेरिएंट्सना मारुती सुझुकीचे स्टार्ट-स्टॉप फंक्शन मिळतील, तर टॉप-स्पेक व्हर्जनमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ असेल, जो या सेगमेंटसाठी पहिला आहे. नवीन डिझायरमध्ये एलईडी लाइटिंग, क्रूझ कंट्रोल, हवामान नियंत्रण आणि बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतील.

हेही वाचा… बजाज पल्सरला टक्कर द्यायला आली ‘TVS’ची ही बाईक, जास्त मायलेजसह मिळतील खास फिचर्स

नवीन डिझायरला वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. तसंच त्याला ब्लाइंडस्पॉट मॉनिटरिंग सिस्टिमदेखील मिळू शकते असं म्हटलं जातंय. सुरक्षेच्या दृष्टीने, डिझायर ABS, EBD, ESP आणि ISIFIX चाइल्ड सीट माउंट्ससह इतर उपकरणांसह येईल.

हेही वाचा… Skoda Kylaq vs Maruti Brezza: मारुतीला टक्कर द्यायला लवकरच येणार स्कोडाची ‘ही’ एसयूव्ही, इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये कोण ठरेल वरचढ? घ्या जाणून…

नवीन मारुती सुझुकी डिझायर इंजिन स्पेसिफिकेशन्स

नवीन मारुती डिझायर Z12E पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. 1.2-लिटर तीन-सिलेंडर युनिट मॅन्युअल किंवा AMT गिअर बॉक्सच्या मदतीने 80bhp आणि 112Nm पीक टॉर्क देते. नवीन मारुती सुझुकीचे स्विफ्टसारखेच इंजिन आहे. पुढील आठवड्यात ही नवीकोरी डिझायर लाँच झाल्यावर Hyundai Aura, Tata Tigor आणि Honda Amaze यांच्याबरोबर स्पर्धा करेल.

Story img Loader