बघता बघता २०१६ केव्हा संपले हे कळलेच नाही. आता नवे वर्ष उजाडणार. या नव्या वर्षात काय काय संकल्प करायचे याचा विचार आतापासूनच आपण करायला सुरूवात केली असणार. नवे वर्ष नवा संकल्प. कोणाचा नियमित व्यायाम करण्याचा संकल्प असतो तर कोणाचा बचतीचा तर कोणाचा आणखी काही, हे संकल्प आपण किती पाळतो हे आपले आपल्याच माहिती. कारण नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे आपण उत्साहात आपला संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण नंतर मात्र ये रे माझ्या मागल्याच. कोण रोज उठून व्यायाम करणार? वेळ कोणाला आहे? आज कंटाळा आला आहे अशी एक दोन नाही तर शंभर कारणे शोधून आपणच आपला संकल्प मोडून काढतो, म्हणूनच यंदा असा संकल्प करून पहा जो तुम्हाला जगण्याची प्रेरणा देईल.
PHOTOS 2016 : सोशल मीडियावर हिट ठरले हे सामान्य चेहरे
सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ती म्हणजे सगळ्यांनी किमान या नव्या वर्षांत तरी हा संकल्प जरूर करून बघण्याची. आपण नेहमी काहीच चांगले होत नाही म्हणून रडत असतो. आजूबाजूच्या सकारात्मक गोष्टींपेक्षा आपण नकारात्मक गोष्टींचा जास्त विचार करू लागतो. आणि याचा सगळाच परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणूनच नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या प्रत्येकांसाठी हा संकल्प फायद्याचा ठरणार आहे. दिवसभरात किंवा आठवड्याभरात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत त्या एका कागदावर लिहायच्या. मग ही चिठ्ठी बंद करून एका बरणीत भरून ठेवायची. अर्थात वर्षभरात न चुकता या बरणीत आयुष्यातील सुंदर क्षणांविषयी चिठ्ठया ठेवायच्या. जेव्हा हे ही वर्ष संपेल तेव्हा ३१ डिसेंबरला ही बरणी उघडायची आणि त्यातल्या चिठ्ठ्या वाचायच्या. आहे की नाही सुंदर कल्पना. आपसुकच नकारात्मक विचार हळहळू बाजूला सारून आपण किती सुखाचे क्षण जगलो याचे एका पेक्षा एक सुंदर आठवणी तुमच्या मनासमोर जाग्या होत जातील.
PHOTOS 2016 : सोशल मीडियावर या विवाह सोहळ्यांची चर्चा अधिक
काम, कामाचा ताण, आयुष्यातील चढ उतार, सततची धावपळ यामुळे हळूहळू आपण नैराश्येच्या गर्तेत सापडतो. काही वेळा स्वत:ला बाहेर काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरतात. म्हणूनच येणारे हे २०१७ आनंदी आणि सकारात्मक गोष्टींनी परीपूर्ण असावे यासाठी हा संकल्प नक्की करून पाहा.