T20 World Cup 2024 : जगभरातील भारतीय क्रिकेट चाहत्यांनी शनिवारी (२९ जून) बार्बाडोसमध्ये केन्सिंग्टन येथे भारतीय संघाने मिळविलेल्या अविश्वसनीय टी-ट्वेंटी विश्वचषक विजयाचा आनंद साजरा केला. भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून, दुसरा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकला. या संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला हे विशेष. विराट कोहलीने ७६ धावांची उपयुक्त अशी खेळी केली आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही अप्रतिम गोलंदाजी करून सामना खेचून आणला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या अर्शदीप सिंग यांनी शेवटी विजयावर शिक्कामोर्तब केले आणि जगभरात आनंदोत्सव सुरू झाला. मोठ्या पडद्यावर हा खेळ पाहण्यासाठी न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अंतिम चेंडू टाकल्यानंतरच जल्लोषाला सुरुवात झाली. चाहत्यांनी आनंदानं ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोषदेखील केला. काही चाहते आनंदाने उड्या मारत; तर काही जण एकमेकांची गळाभेट घेऊन आनंद साजरा करीत आहेत.

तुम्ही व्हायरल व्हिडीओखाली पाहू शकता :

हेही वाचा – Pune : भारताच्या विजयानंतर पुण्यात चालत्या PMT बसवर उभे राहून तरुणांनी केला डान्स, FC रोडवरील Video Viral

मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ व हैदराबादमधील चाहत्यांना या विजयानंतर उत्साहाचे भरते आले होते. भारतातील प्रमुख शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत विजय साजरा केला गेला. चाहते रस्त्यावर भारताचा मोठा झेंडा घेऊन जाताना दिसले. कोणी आनंदाने नाचताना दिसले. अनेक चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.


हेही वाचा –IND vs SA Final: “मुंबईचा राजा रोहित शर्मा”, मरीन ड्राईव्हवरील जल्लोषाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल! नेटिझन्स म्हणतात…

T20 World Cup 2024 फायनल सामना कसा होता?

नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली; परंतु ते लगेचच माघारी परतले. कोहली व अक्षर पटेल यांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी केली आणि सामन्याच्या रोमांचक समाप्तीचा पाया रचला.

भारताने २० षटकांत १७६ धावा केल्या. जेव्हा दक्षिण आफ्रिकेने पकड घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सुरुवातीलाच दोन महत्त्वाचे खेळाडू (रिझा हेंड्रिक्स व एडन मार्कराम) गमावले. पण, नंतर क्विंटन डी-कॉक व ट्रिस्टन स्टब्स यांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी करीत संघाला विजयाची संधी मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

हेन्रिक क्लासेनने शानदार खेळी करीत अवघ्या २७ चेंडूंत ५२ धावा केल्या. मात्र, त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला बाद केल्यावर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडत गेली. ते सामना हरले आणि भारताने चॅम्पियनशिप जिंकली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New york ecstatic fans celebrate indias historic t20 world cup win snk