नवरात्रोत्सवाची सांगता झाली असून आज दसरा देशभरात मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. नवरात्रीचा उत्साह भारताबरोबरच परदेशामधील भारतीय नागरिकांमध्येही दिसून आला. जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्य़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला. यामध्ये अगदी घटस्थापनेपासून ते गरबा आणि दांडिया खेळण्यापर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश होता. सध्या अशाच एका गरब्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्क शहरामधील पोलिस दलातील जवान गरबा खेळताना दिसत आहेत.
ट्विटवर गितीका स्वामी यांनी ट्विट केलेल्या या १ मिनीट १८ सेकंदांच्या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्क पोलिसांचे दोन अधिकारी गरब्यामध्ये नाचताना दिसत आहेत. एका गुजराती भाषेमधील गाण्यावर अनेक भारतीयांनी ठेका धरल्यावर पोलिसांनाही नाचण्याची हौस भावून घेत या नाचणाऱ्यां नागरिकांमध्ये सहभागी झाले. डोक्यावर टोपी, कंबरेला लावलेली बंदूक, वॉकीटॉकी अशा पूर्ण पोषाखात हे दोन्ही पोलिस अधिकारी फेर धरून नाचताना दिसत आहेत. अवघ्या काही तासांमध्ये आठशेहून अधिक जणांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला असून दोन हजारहून अधिक जणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.
Newyork Police dancing to the tunes of Garba. There’s little you can do when such catchy music hits your ears
Wish you all a very happy #Mahanavami#HappyDussehra#ThursdayThoughts pic.twitter.com/IMDNQ6NxWP
— Geetika Swami (@SwamiGeetika) October 18, 2018
विशेष म्हणजे भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यानेही हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.
https://t.co/H2xuqMteFd
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 18, 2018
या व्हिडीओला २३ हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.