कंपनीचा ब्रँड कितीही मोठा असला तरी शेवटी त्या कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांच्या मेहनतीनेच तर ती कंपनी नावारूपाला येते हेही नाकारात येत नाही. कंपनीत स्मार्ट, हुशार आणि प्रयोगशील कर्मचारी नसलीत तर कंपनीचे भविष्य ते काय? म्हणून आजकाल अनेक कंपन्या कर्मचारी निवडताना फार सजग असतात, आपल्याकडे चांगलाच कर्मचारी नोकरीसाठी आला पाहिजे असा त्यांच्या आग्रह असतो, पण असे कर्मचारी मिळवायचे कसे हाही प्रश्न असतो. त्यामुळे चांगले कर्मचारी मिळवण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या शक्कल लढवत आहे. न्यूझीलँडच्या कंपनीने तर भन्नाट ऑफर देऊ केली आहे.
Viral : मतदानासाठी वापरण्यात येणा-या कृत्रिम बोटांचे सत्य उघड
लुकसी वैलिंगटन नावाने सुरू केलेल्या या करिअर ट्रिप प्रोग्रॅमध्ये जगभरातल्या १०० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. वैलिंगटनमध्ये वेगवेगळ्या विभागात तंत्रज्ञानाशी निगडीत नोक-या आहेत. आणि या नोक-यांसाठी जगातल्या सर्वोत्तम उमेदवारांची त्यांना गरज आहे. २० तारखेपर्यंत उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. यातल्या निवडक अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. आता इथे येण्याचा संपूर्ण खर्च ही कंपनीच करणार आहे बरा का, त्यातून मुलाखत झाल्यानंतर कंपनीच्या पैशातून न्यूझीलँडमध्ये पर्यटन करण्याची संधीही मिळणार आहे ते वेगळं. म्हणजे नोकरी लागली तर लागली आणि काहीच झाले नाही तर फुकटात पर्यटन करण्याला मिळणार ते वेगळे. आहे की नाही मज्जा.
वाचा : व्हाईट हाऊसमधले अनुभव सांगण्यासाठी ओबामा दाम्पत्याला मिळणार अब्जावधी रुपये