आपल्या इथे कोणतंही सेलिब्रेशन असो त्यात बॉलिवूडची गाणी हवीच. बॉलिवूडच्या गाण्यांशिवाय पार्टीचा माहोल तयार होत नाही. मग ती लग्नाची वरात असो किंवा वाढदिवसाची जंगी पार्टी. पण हेच चित्र जर का तुम्हाला परदेशात पाहायला मिळालं तर..?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्यूझीलंड पोलिसांच्या ख्रिस्तचर्च पोलीस विभागाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूझीलंड पोलिसांनी दिवाळी पार्टीत बॉलिवूडच्या अनेक गाण्यावर नृत्य सादर केलं. पोलिसांना गाण्यांचे बोल जरी कळत नसले तरी हिंदी गाण्यातील बऱ्याच डान्स स्टेप्स त्यांनी हुबेहूब करण्याचा प्रयत्न केला. न्यूझीलंड पोलिसांच्या या बॉलिवूड स्टाईल डान्सला अल्पवधीत चांगली प्रसिद्ध मिळाली. तिथल्या भारतीय नृत्य दिग्दर्शकांनी पोलिसांना डान्स शिकवला होता. दरवर्षी होणाऱ्या दिवाळी पार्टीत न्यूझीलंडचे पोलीस आवर्जून सहभागी होतात आणि बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य सादर करतात.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या निमित्तानं तिथल्या पॉप, रॉक, जॅझच्या जगात बॉलिवूडच्या गाण्यांनीदेखील आपली जागा बनवली आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं. त्यामुळे तिथल्या लोकांना भाषा ओळखीची नसली तरीही बॉलिवूडचे संगीत जगाच्या पाठीवर कुठेही वाजले तरी कोणालाही आपल्या तालावर थिरकायला लावू शकतं, हे पुन्हा एकदा दिसून आलं.