न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन आणि त्यांच्या चिमुकलीनं नवा इतिहास रचला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीसाठी आपल्या चिमुकलीसह उपस्थिती लावणाऱ्या जसिंडा आर्डेन या पहिल्या महिला ठरल्या आहे. तसेच संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातही बैठकीला पहिल्यांदाच एका लहान मुलानं उपस्थिती लावली आहे म्हणूनच या मायलेकींनी नवा इतिहास रचला आहे. यापूर्वी कोणत्याही देशाच्या महिला पंतप्रधानानं आपल्या बाळासह बैठकीला उपस्थिती लावली नव्हती.

उदारमतवाद-सर्वसमावेशकतेचे यश..

नेल्सन मंडेला शांतता परिषदेमध्ये जसिंडा आर्डेन यांनी भाषण दिलं. सोमवारी ३ महिन्यांची मुलगी निव्ही ती अरोहा हिला घेऊन त्यांनी बैठकीसाठी उपस्थिती लावली. जसिंडा या पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना बेनझीर भुत्तो यांनी मुलीला जन्म दिला होता. जसिंडा आर्डेन ३७ वर्षांच्या आहेत त्यांच्याबद्दल सांगायचं तर त्या आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!

जोडीदार क्लार्क गेफोर्ड मुलीची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सोबत होते. या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. २००८ साली जसिंडा या न्यूझीलंडच्या संसदेच्या सदस्या म्हणून निवडून आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या अनेक वादग्रस्त समस्यांवर जसिंडा यांनी काम केलं आहे. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, मानवी हक्क, पर्यावरण, शांतता, महिलांचे अधिकार, समलैगिंक विवाह यासारख्या अनेक विषयांवर जसिंडा यांनी मांडलेल्या भूमिका या अत्यंत प्रभावी होत्या. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पंतप्रधान पदाची सुत्रं स्विकारली. विशेष म्हणजे त्यांना २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये तरुण आणि महिला मतदारांनी त्यांना प्रचंड पाठिंबा दिला.

Story img Loader