भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मुंबई कसोटीदरम्यान एक चित्र दिसलं जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. सामन्यात अनेकदा अशा काही गोष्टी घडतात की, त्याची बरीच चर्चा होते. आता अशीच एक घटना घडली आहे की, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. किवी टीम या कसोटीदरम्यान असं काही करताना दिसली ज्यात तुम्हाला देसी जुगाडची झलक दिसेल.
मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एजाज पटेलने आपल्या शानदार गोलंदाजीने वर्चस्व गाजवलं, तर शनिवारी सकाळी त्याचा कॅंपमधील सहकारी काइल जेमिसन वेगळ्याच कारणामुळे नाराज दिसला.
मॅनेजर माइकने शोधला देसी जुगाड
न्यूझीलंडचा क्रिकेटर काइल जेमिसनला त्याचे ओले सॉक्स सुकवायचे होते. मग त्याने एक असा उपाय काढला की त्याची समस्या एका मिनिटांत दूर झाली. किवी संघाचे व्यवस्थापक माइक सँडल यांनी वडखेडे स्टेडियमच्या बाल्कनीत लावलेल्या पंख्याखाली स्वतःचे सॉक्स वाळवण्यास सुरुवात केली.
छताच्या पंखाखाली सुकवले सॉक्स
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मॅनेजर माइक सँडल यांचा हा देसी जुगाडचा एक फोटो टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ‘मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लॉंड्रीच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या काईल जेमीसनला मॅनेजर माइक सँडलने असं मुक्त केलं.”, अशी कॅप्शन देत त्यांनी हा फोटो शेअर केलाय.
आणखी वाचा : सोशल मीडियावर आगीसारखा पसरतोय ‘फायर पाणीपुरी’चा VIRAL VIDEO, पाहून तुम्ही व्हाल हैराण!
इथे पाहा व्हायरल फोटो:
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
माइक सँडलचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून प्रत्येकजण या देसी जुगाडबद्दल मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. हा उपाय त्याने स्वतः शोधला होता की टीम इंडियाच्या सदस्याने सल्ला दिला होता हे अद्याप उघड झालेले नाही.