Pakistan vs New Zealand Test Match : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगतदार कसोटी सामना सुरु असतानाच आता एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. तमाम प्रेक्षक कसोटी सामना पाहण्याचा आनंद लुटत असताना पाकिस्तानच्या समालोचकाने कॉमेन्ट्री करताना आपल्या सहकाऱ्याला चक्क एका प्रसिद्ध पॉर्नस्टारच्या नावाने हाक मारली. त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओनं एकच खळबळ उडवली आहे. नेटकऱ्यांनाही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण पाकिस्तानच्या समालोचकाने न्यूझीलंडचा माजी खेळाडू डॅनी मॉरिसनला चक्क पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सच्या नावाने हाक मारली. हा मजेशीर किस्सा कॅमेरात कैद झाला आणि खुद्द पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सने हा व्हिडीओ तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.
पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सने व्हिडीओ शेअर करत भन्नाट कॅप्शनही दिलं
पाकिस्तानच्या समालोचकाने डॅनी मॉरिसनचं नाव डॅनी डॅनियल्स असं घेतल्यानंतर नेटकऱ्यांनी इंटरनेटवर ट्रोलिंगचा धडाकाच उठवला. कारण हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर स्वत: पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सनेही तो व्हिडीओ शेअर केला. या भन्नाट कॉमेन्ट्रीची दखल खुद्द पॉर्नस्टार डॅनीने घेतल्यानं क्रिकेट चाहत्यांसह संपूर्ण क्रिडा विश्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देऊन सोशल मीडियावर एकच हशा पिकवला आहे. समालोचकाने केलेली भन्नाट कॉमेन्ट्री इंटरनेटवर गाजली असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर ट्रोलिंगची चौफेर फटकेबाजी केली आहे.
इथे पाहा व्हिडीओ
कराचीच्या राष्ट्रीय स्टेडीयममध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. पण चौथ्या दिवशी मैदानात जे घडलं, त्या घटनेनं चक्क पॉर्नस्टारलाच व्हिडीओ शेअर करावा लागला. न्यूझीलंडने पहिल्या इनिंगमध्ये ४४९ धावांची मजल मारली. पण पाकिस्तानला न्यूझीलंडने दिलेल्या धावांचं आव्हान गाठण्यात अपयश आलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४०८ धावांवर गारद झाला. पाकिस्तानच्या दौऱ्यातील न्यूझीलंडचा हा दुसरा कसोटी सामना आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ड्रॉ करण्यात आला होता. दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या या कसोटी सामन्यातील कॉमेन्ट्री पॉर्टस्टार डॅनी डनियल्सने ट्विटरवर शेअर केल्यामुळं सोशल मीडियावर क्रिकेटची कमी आणि या कॉमेन्ट्रीचीच चर्चा जास्त रंगताना दिसत आहे.