Layla Kelly Income: कॉर्पोरेट क्षेत्रात ९ ते ६ अशी साचेबद्ध नोकरी करून अनेकजण कंटाळलेले असतात. काहीजण हे चक्र तोडून आपल्या आवडीचे क्षेत्र निवडतात. न्यूझीलंडमधील एका तरूणीने मात्र बँकिंग क्षेत्रातील नोकरी सोडून ॲडल्ट इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लायला केली या पॉर्न स्टार मॉडेलने सात वर्षांपासून करत असलेली नोकरी सोडून ओनलीफॅन्ससाठी काम करण्यास सुरुवात केली. बँकिंग क्षेत्रात काम करत असताना मला केवळ ६५ हजार डॉलर वार्षिक कमाई करता येत होती. हे सर्व पैसे घराचा खर्च भागविण्यात निघून जायचे. यामुळे मला काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात ताळमेळ बसविण्यासाठी वेगळा पर्याय हवा होता.
न्यूज डॉट कॉम एयू या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लायला केली हीने आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. ३४ वर्षीय लायला म्हणाली की, ॲडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करतानाही आव्हानांचा सामना करावा लागतो. जसे की, सहा आकडी उत्पन्न असूनही बँक मला गृहकर्ज देण्यास तयार नाही. पॉर्न स्टार होण्याचा निर्णय एका जुगाराप्रमाणे होता, असे ती म्हणते.
डेली मेलच्या वृत्तानुसार, लायला केलीला २०२३ आणि २०२४ मध्ये न्यूझीलंडची प्रथितयश पॉर्न स्टार असा पुरस्कार मिळाला आहे. मला आयुष्यभर कॉर्पोरेट नोकरीच्या खुर्चीला चिकटून राहायचे नव्हते. मला माझ्या कुटुंबालाही वेळ द्यायचा होता. तसेच माझे उत्पन्नही वाढवायचे होते.
लायलाने सांगितले की, बँकिंग क्षेत्रात काम करत असताना जवळपास ६५ हजार डॉलर्सची कमाई होत होती. यातून आर्थिक स्थैर्य तर दूरच राहिले, पण माझी स्वप्ने पूर्ण करता येत नव्हती. प्रसूती झाल्यानंतर मातृत्वाची सुट्टी संपत असताना मी ओनलीफॅन्स संकेतस्थळावर अकाऊंट तयार केले. यानंतर काहीच दिवसात मला २,५०,००० डॉलर्सचे उत्पन्न मिळाले. ज्यामुळे आयुष्य बदलून गेले आहे. बँकेत काम करत असताना मी माझे स्वतःचे घर घेऊ शकते, असा विचारही केला नव्हता.
लायला पुढे म्हणते की, न्यूझीलंडमध्ये रोजचा खर्च भागवणे खूपच महाग आहे. इथे तुमचे वेतन जरी मोठे वाटत असले तरी खर्चही तितकेच आहेत. ॲडल्ट इंडस्ट्रीमुळे मला आता माझ्या वेतनाशिवाय आणखी १,८५,००० डॉलर्सची कमाई होत आहे.