उत्तर प्रदेशातील बस्तीच्या लालगंज पोलीस ठाण्याच्या शिवपूर गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोणीतरी अज्ञाताने एका नवजात मुलीला पिशवीत टाकून झुडपात फेकून दिले होते. ही चिमुली दोन दिवस झुडपात रडत राहिली, पण कोणालाच याची कल्पना नव्हती. विशेष म्हणजे पावसा-पाण्यात दोन दिवस हे नवजात बाळ पडूनही त्याला काहीच झालं नव्हतं. दोन दिवस ते बाळ झुडपात जिवंत राहिलं. मात्र, या घटनेचे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल नको होती, आजही नकोच आहे

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दैव बलवत्तर म्हणून ही चिमुकली बचावली असून पावसाळ्यात ही निष्पाप मुलगी दोन दिवस झुडपात पडून होती. त्यानंतरही तिने भूक आणि तहानेशी लढत जीवनाची लढाई जिंकली. आपला समाज मुलींच्या हक्काबाबत मोठमोठ्या गप्पा मारतो, मात्र असे प्रकार समोर आल्यावर मुलगी नको, हा नारा आजही अनेक ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतो, तर काही ठिकाणी छुपा.आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद मनात आहेच, हे सिद्ध झाले आहे.

दैव बलवत्तर म्हणून बचावली चिमुकली

मंगळवारी गावातील एक तरुण आपल्या मित्रांसोबत अस्थलवा मंदिराजवळील मनवर नदीत मासेमारीसाठी जात होता. यावेळी तो सांगतो, झुडुपात पिशवी पाहून मी बॅग उघडली तेव्हा आत लहान मुलगी रडत होती. तरुणाने गावचे माजी प्रमुख रामप्रकाश सिंह यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच चौकी प्रभारी कुडार्हा अरविंद यादव हे पथकासह दाखल झाले व त्यांनी मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथे तिची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यात मुलगी निरोगी आढळून आली.

हेही वाचा Crab Attack: नाद करा पण खेकड्याचा कुठं; नांग्यानी थेट केली भल्यामोठ्या गरूडाची शिकार

दोन दिवस राहिली सुरक्षित

गावातील लोकांनी सांगितले की या झाडीत विषारी प्राणी फिरत राहतात, त्यामुळे लोक क्वचितच येथे येतात, परंतु मुलगी दोन दिवस सुरक्षित राहिली, हा एक चमत्कारच म्हणता येईल. दुसरीकडे डॉ.शशी यांनी सांगितले की, नवजात बाळाची चाचणी करण्यात आली, ते पूर्णपणे निरोगी आहे. मुलाला सीडीसी टीमकडे सोपवण्यात आले आहे, जे मुलाची काळजी घेतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newborn baby girl found abandoned in bushes police say viral news up news trending srk
First published on: 09-08-2023 at 12:11 IST