पूर्वीपासून लग्न समारंभासाठी बैलगाडी वापरली जायची. नवरी मुली व कुरोली साठी एक बैलगाडी तर वऱ्हाडसाठी बाकीच्या बैलगाड्या वापरल्या जायच्या. परंतु हल्ली लग्नासाठी बैलगाडीतून वऱ्हाड आलेले कुठेही दिसत नाही. बैलगाडीतून वऱ्हाड आणणे इतिहासजमा होऊ लागलेय. मात्र सध्या वेगळेपणासाठी बैलगाडी वापरली जात आहे. मध्यप्रदेशातही एक तरुण रुबाबात बैलगाडी हाकत वऱ्हाड घेऊन निघाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियारव व्हायरल होत असून नवरदेवाने घेतलेल्या या निर्णयाचे सगळीकडून कौतुक होत आहे.
वावर हाय तर पॉवर हाय!
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये वऱ्हाड नेण्याचा हा पारंपारिक मार्ग निवडल्याने या लग्नसोहळ्याची जिल्ह्यात सगळीकडे चर्चा होतेय. लग्नस्थळी वधू-वरांच्या बैलगाडीसोबत अजूनही बैलगाड्या होत्या. अवास्तव खर्च टाळत नवरा-नवरीने साधेपणाने लग्न करतही आपली संस्कृती जोपासल्याने त्यांचे कौतुक होत आहे. नवरदेवानं संपूर्ण वऱ्हाड याच बैलगाड्यांमधून नेलं आहे. त्यात वृद्धांव्यतिरिक्त लहान मुलेही बसली होती. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लग्नाची मिरवणूक बैलगाडीतून नेण्याची इच्छा नवरदेवाच्या दिवंगत आजीची होती. कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी कुटुंबाने बैलगाडीतून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी वधूही बैलगाडीवर बसून सासरच्या घरी आली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या! रिटायरमेंट नंतर आजोबा जगतायत हवं तसं आयुष्य; VIDEO एकदा पाहाच
वर-वधुसाठी असलेल्या बैलबंडीला छान सजवण्यात आलं होतं. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरली होती. गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगुरु लावण्यात आले होते. नवरदेव व नववधू देखील थाटात या बैलगाडीत बसले होते. ही आगळीवेगळी वरात पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली होती.