लग्नात आपण सुंदर दिसावं यासाठी जोडप्यांकडून कित्येक महिने आधीपासून आपली तयारी सुरू असते. अगदी महागडी डिझायनर साडी किंवा आलिशान लेहंगा गाऊन, सूट वगैरे वगैरे.. मनासारखी साडी खरेदी करण्यासाठी सारा बाजार पालथा घातला जातो. मुलांच्याबाबतीतही परिस्थिती फारशी वेगळी नसते. थोडक्यात काय तर लग्नात प्रत्येक नवरा मुलगा आणि नववधु आपल्या एकंदर दिसण्याबाबत फारच सजग असतात. लग्न एकदाच होतं तेव्हा आपल्या लग्नात सारी हौस पूर्ण नाही करणार तर कधी करणार? असा एकंदर विचार असतो. पण काही जण असेही असतात की, ज्यांना काहीतरी हटके करण्याची भारीच आवड असते.
वाचा : मद्यधुंद तरुणांनी अभिनेत्रीला भररस्त्यात काढायला लावल्या उठाबशा
आता या जोडप्याचंच घ्या ना! आपल्या लग्नात काहीतरी हटके करावं अशी कल्पना त्यांना सुचली मग काय.. लग्नाच्या स्वागत समारंभाला हे जोडपं वेडिंग गाऊन आणि सुटाबुटात येण्याऐवजी चक्क डायनोसॉर बनून आलं. त्यांची वाट बघत उभ्या असलेल्या पाहुण्यांना सुरूवातीला काय सुरू आहे हे कळलंच नाही. पण, नंतर मात्र त्यांची हटके एण्ट्री सगळ्यांनी एन्जॉय केली. विंसेन्ट आणि अॅशले असं या जोडप्याचं नाव आहे.