आर्थिक मंदीसंदर्भात भाष्य करताना भाजपाच्या नेत्यांच्या तोल सुटताना दिसत आहे. देशातील वाहन उद्योगावर सध्या ओला-उबर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे असे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी चेन्नईत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. यावरुन सीतारमन यांच्यावर बरीच टिका झाली. असे असतानचा आता सीतारमन यांचे सहकारी आणि केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी ‘पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्था’ धोरणाचा बचाव करताना एक विचित्र वक्तव्य केले आहे.

‘गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आइन्स्टाइनला गणिताची मदत झाली नाही,’ असं वक्तव्य गोयल यांनी एक बैठकीत केले आहे. दिल्लीमधील व्यापारी महामंडळाच्या बैठकीला उपस्थित असणाऱ्या गोयल यांनी ‘पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थे’बद्दल बोलताना हे अजब वक्तव्य केले. सध्याचे जीडीपीचे आकडे हे ‘पाच ट्रीलीयन अर्थव्यवस्थे’ला प्रतिकूल नसल्यासंदर्भात गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मोदींनी भारत पुढील काही वर्षांमध्ये ‘पाच ट्रीलीयनची अर्थव्यवस्था’ होईल असे मत व्यक्त केले होते. मात्र नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार भारताचा जीडीपी पाचवर सरल्याचे स्पष्ट झाले आहे. याचसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर गोयल यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. ‘टीव्हीवर दिसणाऱ्या आकडेवारीमध्ये पडू नका, त्या गणितामध्ये पडू नका असं मी सांगेल. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आइन्स्टाइनला गणिताची मदत झाली नाही. जर आइन्स्टाइन केवळ उपलब्ध गणिती सुत्रं आणि आधीच्या ज्ञानाच्या आधारावर अवलंबून राहिला असता तर नवीन शोध लागलाच नसता,’ असं गोयल म्हणाले.

गोयल कुठे चुकले

गुरुत्वाकर्षणाचा शोध आइन्स्टाइनने नाही तर न्यूटनने लावला आहे. सापेक्षतेचा सिद्धांताचे सूत्र E= mc2 हे आइन्स्टाइन शोधले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही वैज्ञानिक शोध लावताना थोडीफार आकडेमोड करावीच लागते. तिसरी गोष्ट गोयल यांनी भाषणात आकडेवारीमध्ये न पडण्याचा सल्ला दिला असला तरी देशाचा जीडीपी आणि इतर आकडेवारी अर्थव्यवस्थेचा अंदाज बांधण्यासाठी गरजेची असते. यामध्येही गणित लागतेच.

गोयल यांचं स्पष्टीकरण –

गोयल झाले ट्रोल

गोयल यांच्या या वक्तव्यानंतर ट्विटवर Newton हा शब्द ट्रेण्ड व्हायला लागला. अनेकांनी गोयल यांना ट्विटवरुन ट्रोल केले

दरम्यान, काल सीतारमन यांनी वाहन उद्योगातील मंदीसाठी ओला उबरला दोष दिल्यानंतर त्यांनाही नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते.