क्रिकेटच्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात येतं. या बक्षिसाचं स्वरुप हे एखादा चषक आणि प्रतिकात्मक चेकच्या स्वरुपात मिळणारी रक्कम असं असतं. मैदानात खेळाडूंना मिळणारे प्लास्टिकचे मोठे प्रतिकात्मक चेक हे फक्त दिखाव्यापुरते असतात हे सर्वांना माहितीच असेल. मात्र या चेकचं नंतर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सर्वांना पुरस्कार दिल्यानंतर हे चेक कचऱ्याच्या पेटीत टाकले जातात. भारत विरुद्ध विंडीज यांच्यातील त्रिवेंद्रम येथे झालेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात रविंद्र जाडेजाला मिळालेला सामनावीराचा 1 लाख रुपयांचा चेक हा स्थानिक सफाई कर्मचाऱ्यांना कचरापेटीमध्ये आढळला. यानंतर या घटनेचे फोटो प्रकृती नावाच्या एनजीओने सोशल मीडियावर व्हायरल केले असून, जर बीसीसीआय खेळाडूंना सामनावीराच्या किताबाची रक्कम डिजीटली ट्रान्स्फर करत असेल तर या चेकची गरज आहे का? असा सवाल या संस्थेने विचारवला आहे.

प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अनेक राज्यांमध्ये प्लास्टिकच्या वापरांवर बंदी घालण्यात आलेली आहे. अशावेळी बीसीसीआय या प्रथेला बंद करुन याच्याऐवजी सामनावीराची रक्कम डि़जीटली किंवा अन्य मार्गाने खेळाडूला देण्याचा मार्ग का शोधत नाही? असा प्रश्नही प्रकृती एनजीओने विचारला आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सी या फोटोवर प्रतिक्रीयांचा पाऊस पाडला असून, बीसीसीआयने ही प्रथा बंद करुन याला पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे.