नेपाळमधल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी बिकिनी किलर नावाने कुख्यात असलेला सीरियल किलर चार्ल्स शोभराजला तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चार्ल्स शोभराजचं वय ७८ आहे. त्यामुळे त्याला तुरुंगातून मुक्त करण्यात येणार आहे. त्याला लवकरच त्याच्या देशात परतता येणार आहे. १९७० च्या दशकात चार्ल्स शोभराजचं नाव चर्चेत होतं. बिकिनी किलर म्हणूनही तो गुन्हेगारी जगतात ओळखला जात होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चार्ल्स शोभराजने तुरुंगात केलं होतं लग्न
मात्र आता तुम्हाला आम्ही सांगणार आहोत याच चार्ल्स शोभराजशी लग्न करणाऱ्या एका नेपाळी तरूणीची माहिती. १९७० च्या दशकात चार्ल्स शोभराजने अनेक हत्या केल्या. तो बोलण्याच्या कलेत आणि दुसऱ्याला आकर्षित करण्याच्या कलेत माहिर होता. त्याची ही सगळी पार्श्वभूमी माहित असूनही एक नेपाळी तरूणी होती जिने तुरुंगात चार्ल्स शोभराजशी लग्न केलं.
निहिता बिश्वास नावाच्या २० वर्षांच्या तरूणीने चार्ल्स शोभराजशी लग्न केल्याचा दावा केला. ही तरूणी मूळची नेपाळची आहे. १४ वर्षांपूर्वीची ही हकिकत आहे. निहिता बिस्वास ही त्यावेळी त्याच तुरुंगात होती ज्या तुरुंगात चार्ल्स शोभराज होता. ज्यादिवशी निहिता तुरुंगात गेली त्याच दिवशी तिची भेट शोभराजसोबत झाली.
निहिता चार्ल्सच्या प्रेमात कशी पडली?
निहिता चार्ल्स शोभराजचा खास अंदाज आणि त्याची बोलण्याची कला याकडे मोहित झाली आणि ती त्याच्या प्रेमात पडली. शोभराजला भेटायला ती तुरुंगातून सुटल्यावरही जात होती. याच दरम्यान या दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला. ज्यावेळी निहिताने शोभराज सोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा ती २० वर्षांची होती आणि शोभराज ६४ वर्षांचा होता.
निहितानेच दिली लग्नाची माहिती
बिकिनी किलर चार्ल्स शोभराजशी लग्न केल्यामुळे निहिता याआधीही चर्चेचा विषय ठरली होती. तिने मीडियासमोर आपलं चार्ल्सवर प्रेम असल्याचं आणि त्याच्यासोबत साखरपुडा झाल्याचं सांगितलं होतं. तसंच यानंतर काही दिवसांनी तिने माध्यमांना हेदेखील सांगितलं होतं की चार्ल्स आणि मी लग्न केलं आहे.
बिग बॉसच्या सिझन ५ मध्ये दिसली होती निहिता
चार्ल्स शोभराजसोबत लग्न केल्याची बातमी देऊन निहिता माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. याच दरम्यान बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पाचव्या सिझनमध्ये सहभागी होण्याची संधीही तिला मिळाली होती. मात्र बिग बॉसच्या घरात ती फार काळ टिकली नाही.
बिग बॉसच्या घरात निहिता आणि श्रद्धा शर्मा यांच्यात कडाक्याचं भांडण
बिग बॉसच्या घरात निहिता आणि श्रद्धा शर्मा या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. तसंच मंदीप बेल्वी या स्पर्धकाशीही तिचं वाजलं होतं. मंदिपने निहिताला, चार्ल्ससोबत तुझं सेक्स लाइफ कसं होतं? असा प्रश्न विचारला होता त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला होता. बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत तिने हेदेखील सांगितलं होतं की मी चार्ल्स शोभराजच्या सांगण्यावरूनच बिग बॉसमध्ये सहभागी झाले होते. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
निहिता आता नेमकी कुठे आहे?
बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये निहिताने घातलेले वाद, तिचं घरात सहभागी होणं याची चर्चा झाली. मात्र या सगळ्यानंतर ती अचानक गायब झाली. निहिता बिस्वास आत्ताच्या घडीला कुठे आहे? हे कुणालाच माहित नाही. सोशल मीडियावरही निहिता नाही. आता चार्ल्स शोभराज तुरुंगातून सुटल्यावर जेव्हा आपल्या देशात परतेल तेव्हा निहिता त्याच्यासोबत दिसेल असा अंदाज व्यक्त होतो आहे.
चार्ल्स शोभराजच्या आयुष्यावर जो सिनेमा तयार झाला त्यातही होती निहिताचा रोल
चार्ल्स शोभराजच्या आयुष्यावर मै और चार्ल्स नावाचा एक हिंदी सिनेमा २०१५ मध्ये आला होता. या सिनेमात बिकिनी किलर चार्ल्स शोभराजची भूमिका रणदीप हुडाने केली होती तर अभिनेत्री रिचा चढ्ढाने निहिता बिस्वास हे पात्र साकारलं होतं.