राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद दिल्याची राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी यावरुन भाष्य करताना केलेल्या एका वक्तव्यावरुन निलेश राणेंनी थेट अजित पवारांचा उल्लेख करत पवार कुटुंबियांना टोला लगावलाय.
नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण एकनाथ शिंदेंनी…
पवार नेमकं काय म्हणाले?
३० जून रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवारांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे, अस यावेळेस बोलताना पवार म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा