जेव्हा एखादी महिला गर्भवती असते तेव्हा ती पहिल्या आठवड्यापासून स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करते. जर महिलांनी काळजीपूर्वक व्यायाम केला आणि चांगला आहार घेतला तर होणाऱ्या मुलावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. अनेक महिला गर्भवती असताना हलका व्यायाम देखील करतात. पण नवव्या महिन्यात गर्भवती महिलेला व्यायाम करताना तुम्ही पाहिले आहे का? होय, सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक ९ महिन्यांची गर्भवती महिला जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. तिला व्यायाम करताना बघून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गर्भवती महिलेने जिममध्ये केला धोकादायक व्यायाम
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही एका गर्भवती महिलेला जिममध्ये असा व्यायाम करताना पाहू शकता, ज्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एका गर्भवती महिलेने आपले बेबी बंप दाखवले आणि नंतर दोन्ही पाय हवेत आणि दोन्ही हात जमिनीवर ठेवून हि महिला बॅलन्स करत उभी राहिली. हा व्हिडीओ पाहून भल्याभल्यांना घाम फुटला आहे. नवव्या महिन्यात हे कसं शक्य आहे याचा विचार अनेकजण करू लागळे आहेत.
( हे ही वाचा: तब्बल ९ तास उशिराने आली ट्रेन! प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवरच सुरू केला डान्स, Video व्हायरल)
येथे पाहा व्हिडीओ
( हे ही वाचा: Video: भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी ५ मुलींनी एकीला बेदम मारले; भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला देखील पडल्या लाथा-बुक्या)
व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स चक्रावून गेले
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इतर अनेक महिलांनी त्या गर्भवती महिलेला सावधगिरी बाळगण्यास सांगितले. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले की, ‘असे असू शकते की पोटाच्या आत बाळाच्या अवयवांना आणि मानेभोवती नाळ गुंडाळलेली असावी. असे व्यायाम करताना काळजी घ्या. या व्हिडिओला आतापर्यंत एक लाख ५० हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.