पेन्शनची रक्कम मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा संघर्ष करावा लागतो. कधी सरकारी बाबूगिरीमुळे जिवंतपणाचा दाखला द्यावा लागतो. तर कधी कागदपत्राअभावी बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. सध्या एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतोय जिने पेन्शन गोळा करण्यासाठी चक्क अनवानी पायांनी पायपीट केली. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं असून, निवृत्ती वेतन मिळविण्यासाठी महिलेचा संघर्ष पाहून अनेकांना सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केलाय.
पेन्शन घेण्याकरिता वेदनादायी संघर्ष
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुटलेलल्या खुर्चीचा आधार घेत ही वृद्ध महिला रस्त्यावर अनवानी चालत आहे. वय झालेलं असूनही एवढा त्रास घेत तिला बॅंकेत जावं लागलं. ओडिशाच्या नबरंगपूर येथील ज्येष्ठ नागरिक सूर्या हरिजन असं या महिलेचं नाव असून या वृद्ध महिलेला तुटलेल्या खुर्चीचा आधार घेऊन अनेक किलोमीटर अनवाणी पायी चालावं लागलं. ओडिशाच्या झारीगाव SBI व्यवस्थापक झारीगाव शाखेत तिची पेन्शन गोळा करण्यासाठी महिलेनं एवढी पायपीट केली. हा व्हिडीओ सोशल मीडिआवर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Video viral: नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ बचावला; काळ आला होता पण वेळ आली नव्हती
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये याची तातडीनं दखल घ्यावी आणि मानवतेने वागावे असे आदेश दिले आहेत. यानंतर एसबीआय अधिकाऱ्यांनी सीतारामन यांच्या ट्विटला उत्तर दिले आणि सांगितले की पुढील महिन्यापासून पेन्शन या महिलेच्या दारात पोहोचवली जाईल. अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी पावले उचलण्यात येतील असे आश्वासन बँक व्यवस्थापकाने दिल्याची माहितीही व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.