निर्मला सितारामन यांची रविवारी देशाच्या पूर्णवेळ संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती झाली. रविवारी त्यांनी नव्या पदाची शपथ घेतल्यानंतर विविध क्षेत्रातून याविषयीच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. महिलेला इतके महत्त्वाचे आणि आव्हानात्मक खाते दिल्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाच्या सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिला मंत्र्याच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
भर पावसात मदतीला धावून आलेल्या कॅबचालकाची तिने अशी ठेवली जाण
रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निर्मला सितारामन यांचे नाव संरक्षणमंत्री म्हणून जाहीर झाले. त्यानंतर गुगल इंडियावर त्यांना सर्वाधिक सर्च करण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबाबत असलेली उत्सुकता यामधून दिसून येते. यामध्ये त्यांची पार्श्वभूमी, शिक्षण, त्यांनी केलेले काम याबाबत जाणून घेण्यात नेटिझन्सना रस असल्याचे दिसून आले. काल उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची चाचणी केली. त्यामुळे उत्तर कोरिया आणि निर्मला सितारामन सर्चमध्ये अव्वल होते. एखादी महत्त्वाची घटना घडली की त्याबाबत गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केला जातो. त्यानुसार सितारामन यांच्याबाबत सर्चिंगचा ट्रेंड सर्वाधिक असल्याचे दिसून आले.
Video : …चौथ्या मजल्यावरुन पडणाऱ्या मुलीला शेजाऱ्याने असे वाचवले
जवळपास सकाळपासूनच भारतातील नेटिझन्सचा सुरु झालेला हा सर्च संध्याकाळी उशीरापर्यंत सुरुच होता. सितारामन यांच्यानंतर पियूष गोयल यांच्याबद्दल सर्च करण्यात येत होते. विशेष म्हणजे सितारामन यांच्याबद्दल गोव्यामधून सर्वाधिक सर्च करण्यात आले असून तमिळनाडूमध्ये त्यांना अजिबात सर्च करण्यात आलेले नाही. सितारामन या मूळच्या तमिळनाडूमधील असल्याने तेथील लोकांना त्यांच्याबद्दल माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सर्च करणं टाळलं गेलं असावं, असा अंदाज आहे. याबरोबरच मोदी मंत्रीमंडळ हा विषयही सर्वाधिक सर्च होत होता. गुगलच्या टॉपच्या २० सर्च होणाऱ्या विषयांपैकी १८ विषय हे मंत्रिमंडळाविषयी होते. ट्विटरवर निर्मला सितारामन यांना फॉलो करणाऱ्यांच्या संख्येतही अचानक वाढ झाली असून, फॉलोअर्सची संख्या १५ लाखांहून अधिक झाली आहे.