Nirmala Sitharaman GST: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळले. यात असा दावा करण्यात आला आहे की, स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमण या जीएसटी सिक्रेट ठेवण्याबाबत बोलत आहेत. व्हिडीओमध्ये तरुणपणीच्या निर्मला सीतारमण दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर फार हावभाव दिसत नाहीत. तपासादरम्यान आम्हाला असे आढळून आले की व्हिडीओ एडिट केलेला आहे आणि निर्मला सीतारमण यांचा चेहरा दुसऱ्या व्हिडीओवर मॉर्फ करून लावण्यात आला होता.

काय होत आहे व्हायरल?

व्हिडीओमधील महिला ‘जीएसटी हा एक गुप्त कर’ आहे आणि जिओच्या दरात वाढ झाल्यामुळे यावेळी डेटा जाहीर करता येणार नाही असे म्हणताना दिसते. X यूजर Chirag Patel ने व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi writer actress Madhugandha Kulkarni post viral
“ना पैसे होते, ना धंद्याची अक्कल…”, लेखिका, अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली…
viral video of woman stole a bench outside the building shocking video goes viral on social media
VIDEO: अशा महिलांचं करायचं तरी काय? भरदिवसा महिलेनं काय चोरलं पाहून हसावं की रडावं? हेच समजणार नाही
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
A fan asked Aishwarya Narkar for dinner, the actress gave funny answer
एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं डिनरसाठी, अभिनेत्रीने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

या व्हिडीओमध्ये निर्मला सीतारमण यांच्यासारखीच दिसणारी महिला असं सांगत आहे की, जीएसटी म्हणजे गोपनीय सूचना टॅक्स. त्यामुळे तुम्ही जीएसटीमध्ये किती पैसे मिळतात वगैरे काही विचारू नका. आणि आम्ही तो डेटा देऊ पण शकणार नाही कारण जिओची भाव वाढले आहेत. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर या मोटाभाई (मोदी) ना नाही तर त्या मोटाभाई (अंबानींना) विचारा. तसेच सरकारला किती पैसे मिळतात हा प्रश्न पण विचारू नका. सरकार स्वतःचा व्यवसाय तुम्हाला का सांगेल. मोदींनी लोकसभेच्या प्रचारसभांमध्ये असं सांगितलं होतं की, तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर एक काँग्रेस घेऊन जाईल. पण मी तुम्हाला सांगते की तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर आम्ही त्या दोन्ही जीएसटीच्या नावावर घेऊन जाऊ. कारण जीएसटीमुळेच देशाची प्रगती होणार आहे. जर तुम्ही एक म्हैस काँग्रेसला देऊ शकता तर दोन म्हशी प्रोग्रेसला का नाही देऊ शकत?

इतर वापरकर्ते देखील व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड केला आणि त्यातून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्या. यामुळे आम्हाला मूळ व्हिडीओ मिळाला.

व्हिडीओचे शीर्षक होते: Nirdaya Raman Raghav shows neither account nor accountability

हा व्हिडीओ कॉन्टेन्ट क्रिएटर गरिमाने बनवला आहे. तिने वर्णनात नमूद केले आहे की हे एक पॅरडी (मनोरंजक) चॅनेल आहे. सत्य घटनांवर आधारित विडंबनपर व्हिडीओ या अकाउंटवर शेअर केले जातात. या काल्पनिक कथनात खरी नावे सुद्धा वापरली जात नाहीत.

आम्ही हा व्हिडीओ डीपफेक डिटेक्टर बाय इनव्हिड टूलद्वारे तपासला. आम्हाला आढळले की डिटेक्टरने व्हिडिओमध्ये व्यक्तीचा चेहरा बदलण्याची ६% संभाव्यता दर्शविली आहे.

निष्कर्ष: निर्मला सीतारमण यांनी जीएसटीवर विधान केले नाही, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. व्हायरल दावा खोटा आहे.