Nita ambani jwellary collection: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. निता अंबानी या जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. डिझायनर साड्या, लेहेंगे आणि दागिन्यांचे खास कलेक्शन नीता अंबानी यांच्याकडे आहे. अंबांनी कुटुंबातील महिलांचे दागिने पाहून अनेकदा प्रश्न पडतो की, ज्वेलरी किंमत नक्की किती असावी. अलिकडेच त्यांनी आपला मुलगा अनंत अंबानी याच्या प्रीवेडिंगदरम्यान घातलेल्या नेकलेसनं अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. हा हिरव्या रंगाचा नेकलेसची किंमत जवळपास ४५० कोटी रुपये इतकी होती. पण गंमतीशीर बाब म्हणजे नीता अंबानी यांचा हा नेकलेस बाजारात केवळ १७८ रुपयांना विकला जातोय. होय, विश्वास बसत नाहिये? तर मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच.

अंबानीच्या उत्कृष्ट नेकलेसमध्ये हिरवे, पांढरे, लाल आणि काळे असे विविध रंगांचे हिरे येतात. पारदर्शक प्लॅस्टिक बॉक्समध्ये येणाऱ्या या सेटमध्ये कानातल्यांचाही समावेश आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ब्लॉगर नीता अंबानी यांनी घातलेल्या नेकलेसच्या काही डुब्लिकेट कॉपी दाखवत आहेत. या नेकलेसची किंमत केवळ १७८ ते २०० रुपये आहे. अनंत व राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही नीता अंबानी यांच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. नीता अंबानी यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली चंदेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती व गळ्यात हिरव्या रंगाच्या पन्ना हिऱ्याचा हार घातला होता. नीता अंबानी यांच्या गळ्यातील हारची किंमत जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
Thane, passenger Thane railway station, train and platform,
VIDEO : रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या प्रवाशाला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…
learn how to save money from a lady
सेव्हिंग करणे कोणी यांच्याकडून शिकावं! गल्ला फोडला अन्…पाहा Viral Video

आता तुम्हीच सांगा एवढ्या कोटीचा हार जर एवढ्या कमी किमतीत मिळत असेल तर कोण कशाला सोडेल. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “ए उठ ना यार” ६ वर्षे मित्र कोमात; वाचवण्यासाठी मित्रांची धडपड, हृदयद्रावक VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

हा व्हिडीओ तुम्ही v.v.sonsandvvsons_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. अब्जाधीश मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मार्चमध्ये गुजरातमधील जामनगर येथे अनंत, त्यांचा धाकटा मुलगा आणि राधिका मर्चंट यांच्यासाठी तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. यावेळी नीता अंबानी यांनी हा नेकलेस परिधान केला होता.

Story img Loader