वांद्रे-कुर्ला संकुलामध्ये धीरूभाई अंबानी स्क्वेअरच्या उद्घाटन कार्यक्रमात नीता अंबानी यांनी चक्क मराठीतून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन हजार वंचित मुलांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला होता. यावेळी मुलांनी ‘ वंदेमातरम’ आणि ‘जय हो’ ही गाणी म्हटली. ही गाणी सुरू असताना रंगीत कारंजी उडत होती
मुंबई एक मायानगरी आहे. इथं कोणीही छोटं अथवा मोठं नाही. पण आपल्या श्रमाणे लोकं आपले नशीब बदलतात. माझे सासरे धीरूबाई अंबानी एका साधारण कुटुंबातून आले होते. त्यांचे वडिल एक शिक्षक होते. इंथ आलेल्या सर्व मुलांना मी विचारते की, मोठं होऊन आपल्या देशाला तुम्ही अजून सुंदर बनवणार? नीता अंबानी यांच्या या प्रश्नानंतर विद्यार्थांनी एका सुरूात हो असे उत्तर दिले. धीरूभाई सारखे उद्योगपती, लता मंगेशकरांसारख्या गायिका आणि सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू होण्याची इच्छा तुमच्याही मनात आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारला. या सर्व प्रश्नावर विद्यार्थांनी सकारात्मक उत्तरे दिली.
सचिन तेंडुलकर , लता मंगेशकर आणि धीरूभाई अंबानी यासारख्या मोठ्या लोकांनी आपलल्याला मेहनत करायला तर शिकवलेच, शिवाय माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होते हे देखील त्यांनी दाखवून दिले आहे. या दिग्गजांप्रणाणे तुम्हीही देशाचे नाव मोठं करा असा सल्ला नीता अंबानी यांनी विद्यार्थांना दिला.
पाहा व्हिडिओ –