Neeta Ambani at Chat Shop : प्रसिद्ध व्यावसायिक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या काशी या ठिकाणी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी शंकराच्या या मंदिरात मुलाच्या लग्नाची पत्रिका ठेवली आणि आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांची पावलं वाराणसीतल्या प्रसिद्ध काशी चाट सेंटरकडे वळली. या ठिकाणी जाऊन त्यांनी टमाटर चॅट आणि आलू टिक्कीचा आस्वाद घेतला.

काशी चाट भंडारमध्ये घेतला स्वाद

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत आणि सून राधिका यांचे लग्न आहे. त्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी नीता अंबानी काशी विश्वानाथ यांच्या दरबारात आल्या. त्यांनी काशी विश्वनाथ आणि गंगा मातेचे आशीर्वाद घेतले. गंगा आरतीमध्ये सहभागी घेतला. काशी विश्वनाथ धाम येथे दर्शन आणि पूजा केल्यानंतर त्या काशी चाट भंडारला पोहोचल्या. या ठिकाणी त्यांनी आलू टिक्की खाली. या संबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नीता अंबानी यांच्यासह प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा होते. माध्यमांशी बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, “मी दहा वर्षांनी वाराणसीत आले आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉरची भव्यता पाहून खूप आनंद झाला. काशी पूर्णपणे बदलली आहे.”

हे पण वाचा- १२ जुलै का आहे खास? अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी हा दिवसच का निवडला? जाणून घ्या

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा सोहळा १२ जुलैपासून

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचा मुख्य सोहळा शुक्रवारी १२ जुलैपासून सुरु होणार आहे. लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना पारंपारिक भारतीय पोशाख घालून येण्यास सांगण्यात आले आहे. रविवारी १४ जुलै रोजी लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. राधिका मर्चंट एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. या दोघांचा प्री वेडिंग सोहळाही चांगलाच चर्चेत होता.

हे पण वाचा- Video: अनंत-राधिकाचं दुसरं प्री-वेडिंग होतंय ते आलिशान क्रूझ पाहिलंत का? प्रसिद्ध पंजाबी गायकाने व्हिडीओ केला शेअर, म्हणाला…

अनंत आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीचा सोहळा या वर्षाच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाला होता. या सोहळ्यास जगभरातील दिग्गज आले होते. बिल गेट्सपासून एलॉन मस्कसारखे उद्योगपतींनी त्या प्री वेडिंग समारंभाला उपस्थित होते. तसेच हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती. . तसेच दुसरे प्री-वेडिंग समारंभ २९ मे ते १ जून दरम्यान क्रूजवर आयोजिच केले होते.