उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. या शाही सोहळ्याचं आयोजन अंबानी यांच्या निवासस्थानी अँटिलिया इथं करण्यात आलं होतं. या सोहळ्यात अंबानी आणि मर्चंट कुटुंबासह अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. अगदी रणबीर-दीपिका, अक्षय कुमार, शाहरुख खान व कुटुंब, वरुण धवन पत्नी नताशा दलालसह, तसेच सचिन तेंडुलकर व अंजली तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Anant Ambani Radhika Merchant: कोण आहे राधिका मर्चंट? जाणून घ्या अंबानी कुटुंबाच्या धाकट्या सूनेबद्दल

गुजराती कुटुंबांमध्ये ‘गोळधाणा’ नावाचा कार्यक्रम होतो. यामध्ये वराच्या घरी लग्नापूर्वी एक कार्यक्रम होतो. यात वधूचे कुटुंब वराच्या कुटुंबीयांसाठी भेटवस्तू आणि मिठाई आणतात. नंतर रिंग सेरेमनी होते आणि ते वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेतात. हा सोहळा आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मोठ्या थाटामाटात पार पडला. राधिकाने एंगेजमेंटमध्ये गोल्डन लेहेंगा घातला होता. त्याचवेळी अनंत अंबानीने निळ्या रंगाची शेरवानी घातली होती.

अनंत व राधिकाच्या एंगेजमेंट सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सोहळ्यात राधिका तिची नणंद इशा अंबानीच्या मुलांना खेळवताना दिसली. तसेच नीता अंबानी यांनी राधिकाचं घरात स्वागत केलं. अंबानी कुटुंबाने गोल्डन रंगाचे कपडे परिधान केले होते. या खास सोहळ्यात सर्वजण खूपच आनंदी होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita ambani welcomes radhika merchant anant ambani get engaged isha ambani video hrc