कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यानच्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पासाठी आरे परिसरातच कारशेड उभारण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी पुकारलेल्या ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा वापर करून बाल न्याय कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मात्र आदित्य ठाकरेंविरोधात कारवाई करण्याच्या या आदेशांवरुन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केलीय.

नक्की वाचा >> “‘मी’पणा विसरुन ‘आम्ही’ अशी व्यापक…”; राहुल गांधींनी मराठीतून लिहिलेली आषाढीची पोस्ट अनेकांनी नितेश राणेंना पाठवली, कारण…

प्रकरण काय?
राज्य सरकारच्या आरेमध्ये कारशेड उभारण्याच्या निर्णयाविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ११ वाजता आरेतील पिकनिक पॉइंट येथे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था, राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याची तक्रार ‘सह्याद्री राइट फोरम’ने केली. या आंदोलनात लहान मुलांचा वापर करण्यात आल्याची तक्रार ‘सह्याद्री राईट फोरम’चे विधी विभाग प्रमुख दृष्टीमान जोशी यांनी ट्विटरवरून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे केली होती.

नक्की पाहा >> Photos: “मला वाटतं त्यांचं…”; २०० जागा जिंकण्याच्या CM शिंदेंच्या दाव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया ऐकून पिकला एकच हशा

त्या पत्रात काय?
या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने सोमवारी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे आणि इतर संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी करूत गुन्हे दाखल करावेत. सबंधित मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करून त्यांचेही जबाब नोंदवावेत. या सर्व कार्यवाहीचा अहवाल एफआयआरच्या प्रतीसह पुढील तीन दिवसांत सादर करावा, असेही आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आयोगाच्या या आदेशांबाबत पर्यावरमप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

नक्की वाचा >> “…बदल्यात तुमच्या पाया पण पडू”; अजित पवारांचा Video शेअर करत निलेश राणेंचं वक्तव्य

नक्की वाचा >> फडणवीसांना ‘उपमुख्यमंत्री झालेले पहिले मुख्यमंत्री’ म्हणणाऱ्या शरद पवारांना निलेश राणेंचा टोला; म्हणाले, “अजित पवार…”

नितेश यांचा टोला…
याचवरुन नितेश राणेंनी या आदेशाचं पत्रक ट्वीट करत आदित्य यांना लक्ष्य केलंय. “राष्ट्रीय बाल हक्क आयोग अशाप्रकारे जी व्यक्ती स्वत: एक लहान मुल आहे तिला नोटीस कसं काय पाठवू शकतं, हा अन्याय मान्य नाही,” असं उपरोधिक ट्विट नितेश यांनी केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी इमोजी वापरुन शेवटी, “बच्चे की जान लोगे क्या” असा टोलाही लगावलाय.

नक्की वाचा >> “त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…”; एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली नाराजी
दरम्यान, आदित्य यांच्याविरोधातील या आदेशासंदर्भात पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. शाळकरी मुलांचे पर्यावरणासंबंधीचे ज्ञान वाढविणे आणि त्यांना पर्यावरणासंबंधी जागृत करणे हे पालक, शिक्षक आणि सर्वांचे कर्तव्य आहे. जंगल वाचविण्यासाठी जर मुले पुढे आली, पर्यावरणाबाबत जागृत होण्याचा प्रयत्न करू लागली तर तो गुन्हा आहे का? असा सवाल ‘वनशक्ती’चे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यानी केला आहे. आरेमध्ये लहान मुले आपल्या पालकांसोबत आंदोलनासाठी आली होती. आपल्या मुलांना जंगलाचे महत्त्व कळावे म्हणून पालक मुलांना घेऊन आले होते. आदित्य ठाकरे यांनी मुलांना आणले नव्हते, असे स्पष्ट करीत त्यांनी आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. हे केवळ राजकारणातून घडत असून ‘आरे वाचवा’ आंदोलनावरून राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

Story img Loader