महाविकास आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे कारण सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मंगळवारी बंडाचा झेंडा पुकारला आणि शिवसेना विरुद्ध शिंदे असा संघर्ष राज्याच्या राजकारणामध्ये सुरु झाला आहे. असं असतानाच आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला शिंदे सेना म्हणणाऱ्या प्रसारमाध्यमांवर आक्षेप घेतला आहे. नितेश राणे यांनी आपली ही नाराजी ट्विटरवरुन बोलून दाखवली असून उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या आमदारांची संख्या पाहता त्यांनाच ‘उद्धव सेना’ म्हटलं पाहिजे असा खोचक टोलाही नितेश यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> राणेंनी आधी पवारांना “…तर घर गाठणं कठिण होईल”चा इशारा दिला अन् नंतर शिवसेनेला लक्ष्य करत म्हणाले, “संजय राऊत तुमचे…”

बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी दिवसभरात गुवाहाटीला जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षात कायदेशीर फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश आमदारांचे म्हणजेच पक्षाच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यापाशी झाले आहेत. शिवाय शिवसेनेचे ९ सहयोगी अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने बंडातील आमदारांची एकूण संख्या ४६ झाली.

नक्की वाचा >> फडणवीसांसोबतचा हातात हात घातलेला फोटो सोमय्यांनी केला शेअर; ठाकरे सरकारला इशारा देत म्हणाले, “माफिया…”

शिवसेनेच्या बंडखोर गटाचा उल्लेख अनेक प्रसारमाध्यमांकडून ‘शिंदे सेना’ असा केला जात आहे. मात्र यावर निलेश राणेंनी ट्विटरवरुन आक्षेप घेतलाय. “मला आश्चर्य वाटत आहे की प्रसारमाध्यमांमधील मित्र या गटाला शिंदे सेना का म्हणत आहेत? शिवसेना ही माननिय बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंतांची असून ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे ती खरी शिवसेना आहे. याचनुसार दुसऱ्या बाजूला उद्धव सेना म्हटलं पाहिजे,” असं ट्विट नितेश यांनी केलंय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदे प्रकरण : निलेश राणेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “५० वर्षांच्या राजकारणामध्ये पवार साहेबांनी…”

बुधवारी वर्षावर बैठकीला अन् गुरुवारी गुवहाटीत
बुधवापर्यंत शिवसेनेसोबत असलेले व बंडखोर शिवसेना नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी व निदर्शने करणारे माहीममधील आमदार सदा सरवणकर हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मंगळवारी हेच सरवणकर शिवसेना भवनाच्या बाहेर बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आघाडीवर होते. अचानक त्यांनी बुधवारी भूमिका बदलली आणि गुवाहाटी गाठले. कृषीमंत्री दादा भुसे हे वर्षा निवासस्थानी बुधवारी बैठकीला उपस्थित होते. गुरुवारी सकाळी हे शिंदे यांच्या गोटात सामील झाले.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवार आणि शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्यं; म्हणाले, “अजित पवारांना…”

याशिवाय मुंबईतील मंगेश कुडाळकर, कोकणातील दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आमदार गुरुवारी दिवसभरात एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले.  या पाच शिवसेना आमदारांमुळे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३७ वर पोहोचली. याशिवाय एकूण ९ अपक्ष आमदार सोबत असल्याची यादी एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आली.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

३७ झाले तरी शिंदे थांबले कारण…
शिंदे यांना ३७ आमदारांचे पाठबळ लाभले असले तरी त्यांनी गुरुवारी दिवसभरात स्वतंत्र गट किंवा विधिमंडळ पक्षात फूट पडल्याबद्दलच राज्यपालांकडे पत्र सादर केले नव्हते. आणखी काही आमदार बरोबर येतील याची शिंदे हे वाट पाहात असावेत. ३७ हा काठावरचा आकडा आहे. एखादा आमदार फिरला वा कायदेशीर मुद्यांवर काही आमदार अपात्र ठरल्यास सर्वच आमदार अडचणीत येऊ शकतात. यामुळेच सारी खबरदारी घेण्यात येत असावी, अशी शक्यता वर्तविली जाते.