शिवसेनेच्या खासदारांमधील एक गट बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या बातम्यांमुळे राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता या खासदारफुटीवरुन पुन्हा एकदा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदास संजय राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. राऊत यांनी केलेल्या एका दाव्यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना जुळी भावंड आहेत हा असा खोचक प्रश्न ट्वीटरवरुन विचारलाय.

नक्की वाचा >> “७० वर्षांचा असूनही…”, रामदास कदमांनी बोलून दाखवली आदित्य ठाकरेंना ‘साहेब’ म्हणावं लागल्याची खंत; म्हणाले, “दीड वर्ष माझ्या…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झालं असं की, शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार शिंदे गटातील बैठकीत सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, अरिवद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. लोकसभेतील खासदार गजाजन कीर्तीकर दिल्लीत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदारांनी बैठकीला हजेरी लावली. अन्य १२ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

याच बैठकीनंतर संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी शिंदे गटाच्यासोबत नवीन कार्यकारणी निर्माण केली यासंदर्भात प्रश्न विचारताना यामागील सुत्रधार कोण असं विचारण्यात आलं. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे असं वाटतं? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी भाष्य करताना संजय राऊत यांनी, “मुख्यमंत्र्यांना दिल्लीत का यावं लागतंय? शिवसेनेचे मुख्यमंत्री याआधी कधी दिल्लीत आले नव्हते. आमचं हायकमांड मुंबईत आहे. आमचं मुख्यायलय दिल्लीमध्ये आहे. भाजपासोबत आमचं जेव्हा राज्य होतं तेव्हा आम्ही कधी दिल्लीत आलो नव्हतो. आमचे यापूर्वीचे मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊनच आदेश, सूचना घेत होते. प्रथमच महाराष्ट्र हा चमत्कार पाहतोय,” अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही टीका केली.

नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”

मात्र याच टीकेवरुन नितेश राणे यांनी संजय राऊत यांना २०२० मध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदारपुत्र आदित्य ठाकरे हे दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले होते अशी आठवण करुन दिलीय. मात्र अगदी उपरोधिक पद्धतीचं ट्वीट करत नितेश राणेंनी राऊत यांच्या काही स्मरणात राहत नाही असं सूचित करायला त्यांना ‘गजनी’ म्हटलं आहे. ‘गजनी’ चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे प्रमुख अभिनेता गोष्टी विसरतो तसेच संजय राऊत असल्याचं यामधून राणेंना अधोरेखित करायचं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांच्या घरातील ‘तो’ फोटो शेअर करत निलेश आणि नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “अजूनही…”

नितेश राणेंनी २१ फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत सोनिया गांधीचं निवासस्थान असणाऱ्या १० जनपथ येथे झालेल्या भेटीचा फोटो पोस्ट करत संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. “गजनी राऊत यांच्या सांगण्यानुसार शिवसेनेचे मुख्यमंत्री कधीच हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला आले नाहीत. मग या फोटोमध्ये कोण आहे? जुडवा?”, अशा कॅप्शनहीत नितेश राणेंनी फोटो पोस्ट केलाय. या फोटोत मध्यभागी सोनिया गांधी उभ्या असून त्यांच्या एका बाजूला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे उभे आहेत. ठाकरे पिता-पुत्र सोनिया गांधींच्या भेटीदरम्यान त्यांना पुष्पगुच्छ देताना काढलेला हा फोटो आहे.

नक्की पाहा >> Photos: दिल्लीतही शिंदे गट? भाजपा अजून एका ‘मास्टरस्ट्रोक’च्या तयारीत; केसरकर म्हणाले “…तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा ऐकतील”

नक्की वाचा >> त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

राज्यामध्ये नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर दोनच महिन्यांनी उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधींचे आभार मानले होते अशी आठवण नितेश राणेंनी या फोटोच्या माध्यमातून करुन दिलीय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane slams sanjay raut for saying sena cm has never come to delhi to meet high command posted old photo of uddhav and sonia gandhi scsg