Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide: सुप्रसिध्द कला दिगदर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी चौक येथील एन डी स्टूडीओ येथे गळफास लावून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. देसाई यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या रविवारी (६ ऑगस्ट) तीन दिवस आधी आली आहे. १९८७ पासून कला चित्रपटांच्या कलादिग्दर्शनाचे काम करणाऱ्या नितीन देसाई यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत असंख्य सुंदर कलाकृती साकारल्या होत्या. तर यंदाच्या गणेशोत्सवासाठी साकारलेला लालबागच्या राजाचा मंडप नितीन देसाई यांनी साकारलेला शेवटचा मंडप ठरला आहे.
जुलै महिन्यात, देसाई यांनी इंस्टाग्रामवर गणेश चतुर्थीच्या उत्सवापूर्वी मुंबईच्या लालबागच्या राजाच्या ९० व्या वर्षासाठी मंडप उभारणी सुरु झाल्याची पोस्ट केली होती. “लालबागच्या राजाचा विजय असो. लालबागच्या राजाच्या श्री गणेशाचे मंडप उभारणीचे १२ वे वर्ष. लालबागच्या राजाचे आगामन जवळ आले आहे त्याआधी आधी त्याच्या आशीर्वादाने मंडप उभारणीची मुहूर्तमेढ रोवली गेली.” असे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले होते.
नितीन देसाई यांनी उभारलेला शेवटचा मंडप
हे ही वाचा<< Nitin Desai Suicide: नितीन देसाईंवर होतं तब्बल २४९ कोटींचं कर्ज; एन. डी. स्टुडिओचीही होणार होती जप्ती!
दरम्यान लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी नितीन देसाई यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. , त्यानजी एका निवेदनात म्ह्टले की “आमच्यासाठी ही दु:खद आणि धक्कादायक बातमी आहे. ते रविवारी आमच्याबरोबर जवळपास दोन तास त्यांच्या टीमसह मंडपाच्या कामावर लक्ष ठेवून होते. असे काही घडू शकते याचा अंदाजही नव्हता. देसाई हे लालबागच्या राजाचे भक्त होते आणि ते २००९ पासून आमच्याशी जोडले गेले. कदाचित एक वर्ष त्यांची तब्येत खराब असताना त्यांनी मंडपाची रचना केली नसावी अन्यथा ते नेहमी आमच्याबरोबरच होते. त्यांनी नेहमी वेळेवर काम पूर्ण केले आणि त्यांच्या कामाचे सर्वांनी नेहमीच कौतुक केले आहे.”