Nitin Gadkari Interview: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे खवय्ये आहेत हे सर्वच जाणतात. शुद्ध शाकाहारी असणारे गडकरी अनेकदा आपल्या आवडीच्या हॉटेल्समध्ये जाऊन चमचमीत जेवणाचा आस्वाद घेताना दिसून आले आहेत. गडकरींना अस्सल भारतीय जेवणासह चायनीज खाण्याचीही आवड आहे. एका कार्यक्रमात गडकरी यांनी सांगितले होते की जेव्हाही ते मुंबईत असतात तेव्हा शाहरुख खानच्या घराजवळ म्हणेजच बांद्रा येथे असणाऱ्या ताज लँड्स एन्डमध्ये त्यांना भोजन करणे फार आवडते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितिन गडकरींनी शेफला विचारला पगार..

नितिन गडकरी सांगतात की ताज मध्ये एक स्वतंत्र चायनीज रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंट मध्ये डेव्हिड नावाचा एक शेफ आहे ज्याच्या हातचे जेवण मला फार आवडते. एक दिवस गडकरींनी डेव्हिडला तू कुठून आला आहेस हे विचारलं असता तो म्हणाला की मी हॉंगकॉंगचा आहे. यावर आश्चर्यचकित होऊन गडकरी म्हणाले की, मग तू भारतात काय करतोयस? तर डेव्हिडने सांगितलं की मला फिरायला आवडतं. मग गडकरींनी सहजच डेव्हिडला त्याचा पगार विचारला असता त्याने सांगितलं की फक्त १५ लाख. जे ऐकून गडकरींना विश्वासच बसत नव्हता.

१३५ किलोचे होते नितीन गडकरी

अलीकडेच नितीन गडकरी इंडियन एक्सप्रेसचाय अड्डा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या खाण्यापिण्यावर व लाइफस्टाइल बद्दल भाष्य केले. त्यांनी सांगितले की एकेकाळी माझे वजन १३५ किलो होते जे आता मी कमी करून ८९ किलो वर आणले आहे. यासाठी मी रोज न चुकता योगा करतो.

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

दरम्यान, नितीन गडकरी म्हणाले की मला विविध पदार्थांचा आस्वाद घेणं आवडतं, म्हणूनच मी ज्या शहरात असतो तिथे असणाऱ्या सर्व हॉटेल्सची मला माहिती असते. तुम्ही मला विचारलं तरी मी सांगू शकतो . रोज संध्याकाळी ७ नंतर मी विचार करतो की आज कुठल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी जायला हवे. आता माझं खाणं जरी कमी झालं असलं तरी खाण्याची आवड कमी झालेली नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari asked salary of taj hotel chef says shares weight loss journey from 135 kg to 89 kg svs