Nitin Gadkari Fact Check Video:  विश्वास न्यूज : केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात व्हिडीओतून नितीन गडकरींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे कौतुक केल्याचा दावा केला जात आहे; ज्यामुळे आता नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पण, ‘विश्वास न्यूज’ने या व्हायरल व्हिडीओचा तपास केला तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले, ते नेमके काय होते ते जाणून घेऊ.

व्हायरल व्हिडीओ बीबीसी वृत्तसंस्थेच्या मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यानचा आहे. त्यात मुलाखतीदरम्यान एका अँकरने गडकरींना राहुल गांधींबद्दलचा प्रश्न विचारला; ज्यावर ते उत्तर देताना दिसत आहेत. याच उत्तरातून गडकरींनी राहुल गांधींचे कौतुक केल्याला दावा आता व्हायरल व्हिडीओतून केला जात आहे.

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
rahul gandhi Arvind Kejriwal Sattakaran
राहुल गांधींच्या रडारवर केजरीवालच का? काँग्रेसचं राजधानीत पुनरागमनासाठीचं धोरण काय?
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

काय होत आहे व्हायरल?

२६ डिसेंबर २०२४ रोजी व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करताना फेसबुक युजर ‘महेंद्र थानगाजी’ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, (भाषांतर), “अँकर : तुम्ही राहुल गांधींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता… नितीन गडकरी : ज्यांना मी दुरूनच लहान समजत होतो; पण जवळ गेलो तेव्हा समजले की, ते (राहुल गांधी) खूप मोठे आहेत.”

पोस्टची अर्काइव्ह लिंक येथे पहा.

https://perma.cc/V4H3-539K

तपास :

व्हिडीओचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. यावेळी आम्हाला आढळले की, व्हिडीओच्या मागील बाजूस बीबीसी लिहिलेले आहे. त्यानंतर तपास पुढे नेत आम्ही बीबीसीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलचा तपास सुरू केला. आम्हाला बीबीसी हिंदी न्यूजच्या अधिकृत YouTube चॅनेलवर व्हायरल व्हिडीओची मोठी आवृत्ती सापडली. हा व्हिडीओ १० ऑक्टोबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता.

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?

व्हिडीओमध्ये २६.५९ मिनिटांवर अँकरने नितीन गडकरींना विचारते की, तुम्ही राहुल गांधींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? त्यावर गडकरींनी उत्तर दिले की, मी सर्वांकडेच चांगल्या दृष्टिकोनातून पाहतो.

पुढे अँकरने विचारले, “तुमचे त्यांच्याविषयी काय मत आहे, ते विरोधी पक्षनेते आहेत” यावर गडकरी म्हणतात की, फक्त त्यांच्याविषयीच नाही, तर सर्वांबद्दल माझे चांगलेच मत आहे, असे म्हणत ते त्यांच्या आयुष्यातील अनुभवाच्या गोष्टी सांगू लागतात. ते म्हणतात, “तुम्हाला माहीत नसेल. येथे कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे ज्येष्ठ नेते ए. बी. बर्धन होते, ते नागपूरचे होते. मी त्यांना लहानपणापासून पाहिले आहे. ते माझ्यासाठी एक मोठे आयकॉन होते. तेव्हा कृषी संघटनेत शरद जोशी होते. मला खूप शिकायला मिळाले. मी त्यांना खूप मानतो. मी नुकतेच संघावर एक पुस्तक लिहिले आहे. सध्या ते इंग्रजीत आहे, ते प्रकाशित झालेले नाही. भाऊराव हे मेहुणे होते. संघात काम केलेल्या बाळासाहेब देवरस यांचे बंधू. बरेच लोक आहेत. मला अनेक लोकांकडून प्रेरणा मिळाली. एक गोष्ट सांगून मी शेवट करू इच्छितो. दिल्लीत आल्यानंतर एक गोष्ट अनुभवली की, मला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. क्रिकेटपटू, चित्रपट अभिनेते, बिल गेट्सपासून ते जगभरातील लोकांपर्यंत. तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की, ज्यांना मी दुरून खूप मोठे समजत होतो; त्यांच्याजवळ गेल्यावर मला कळले की, ते लहान आहेत आणि दुरूनच मी ज्यांना लहान मानले होते, त्यांच्याजवळ गेल्यावर कळले की, ते खूप मोठे आहेत. त्यामुळे मी मानतो की, चांगुलपणा आणि गुणवत्तेमुळे अगदी लहानातली लहान व्यक्तीदेखील तुम्हाला खूप काही शिकवते.”

तपासादरम्यान, आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने गूगलवर देखील सर्च केले, त्यावेळी गडकरींनी राहुल गांधींची स्तुती केल्याचा उल्लेख असलेली कोणतीही बातमी आम्हाला आढळली नाही.

अधिक माहितीसाठी आम्ही भाजपाचे प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा दावा खोटा आणि व्हिडीओ एडिटेड असल्याचे सांगितले.

शेवटी खोट्या दाव्यासह व्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरचे अकाउंट आम्ही स्कॅन केले. त्यावेळी आम्हाला आढळले की, हा युजर विशिष्ट विचारधारेशी संबंधित पोस्ट शेअर करतो.

निष्कर्ष :

‘विश्वास न्यूज’ला आपल्या तपासात असे आढळून आले आहे की, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मूळ मुलाखतीचा व्हिडीओ एडिट करून, त्यात त्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केल्याचा खोटा दावा करून शेअर केला जात आहे. मुलाखतीदरम्यान अँकरने गडकरींना राहुल गांधींबद्दल काही प्रश्न विचारले होते. त्यावर गडकरींनी उत्तर दिले की, त्यांचे सर्वांबद्दल चांगले मत आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव कथन करण्यास सुरुवात केली. पण, हा भाग व्हिडीओमधून एडिट करून काढून टाकण्यात आला आहे; ज्यामुळे त्यांनी राहुल गांधींचे कौतुक केल्याचे दिसते. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आणि खोटा आहे.

(ही कथा मूतः ‘विश्वास न्यूज’ने प्रकाशित केली होती आणि ‘शक्ती कलेक्टिव्ह’चा एक भाग म्हणून ‘लोकसत्ता’ने पुनर्प्रकाशित केली आहे.)

https://www.vishvasnews.com/politics/fact-check-nitin-gadkari-statement-on-rahul-gandhi-edited-video-viral/?utm_source=homepage&utm_medium=dktp_s2&utm_campaign=editorpick

Story img Loader