Nitin Gadkari Nagpur Win Victory Viral Video: ‘ ४०० पार’ची घोषणा देणाऱ्या भाजपाला लोकसभा निकालात एनडीएच्या एकत्रित बळावर सुद्धा ३०० चा टप्पा गाठता आलेला नाही. परिणामी देशभरातून विजयी होऊनही मोदींवर व परिणामी भाजपावर टीका होत आहे. विरोधी पक्षांपासून ते विरोधी पक्षांच्या समर्थकांपर्यंत अनेक स्तरावरून देशातील नेतृत्व बदलाची मागणी होत आहे. भाजपाच्या काही मंत्र्यांचे समर्थक सुद्धा आपल्या नेत्याची पंतप्रधानपदी वर्णी लागावी यासाठी मागणी करत आहेत. या सगळ्या चर्चांमध्ये नितीन गडकरी यांच्या नावाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. सुरुवातीपासूनच भाजपातील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गडकरी यांची ओळख होती, याच बळावर गडकरींनी भाजपाची महाराष्ट्रात होणारी पडझड एकहाती थांबवली. कालच्या लोकसभा निकालात सुद्धा गडकरींनाच मताधिक्याने भाजपाचे महाराष्ट्रातील स्थान राखून ठेवता आले. या विजयानंतर आता गडकरींना आपल्या घरगुती सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतील साधेपणा अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.

काल लोकसभेचा निकाल लागत असताना आघाडीवर असणाऱ्या व नंतर विजयी झालेल्या अनेक नेत्यांनी अत्यंत लक्षवेधी सेलिब्रेशन केलं. पुण्यात मोहोळ यांनी गुलाल खेळून, तर कोकणात नारायण राणेंच्या रॅलीमध्ये नाचून, गुलाल उधळून राणे कुटुंबाकडून आनंद साजरा करण्यात आला. गडकरींनी सुद्धा सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांनी आणलेला केक कापून विजय साजरा केला पण त्यानंतर अत्यंत घरगुती वातावरणात आपल्या नातवंडांसह वेळ घालवून आपलं यश सेलिब्रेट केलं. गडकरींनी सोशल मीडियावर ‘आजोबाच्या विजयाने नातवंड देखील खुश’ असे कॅप्शन देत पोस्ट केलेल्या व्हिडीओत त्यांची नातवंडं लाडक्या आजोबांच्या भोवती घोळका करून बसलेली दिसतायत. फोटोसाठी पोज देऊन झाल्यावर मग एक चिमुकली मागून “आबा जिंकले” असं म्हणते आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. गडकरी सुद्धा यावर स्मित करतात या व्हिडीओमधील साधेपणा नेटकऱ्यांना खूप भावला आहे.

Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
nitin Gadkari constitution of India
Nitin Gadkari: भाजप राज्यघटना कधीच बदलणार नाही, कोणाला बदलूही देणार नाही – नितीन गडकरी
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Dr Sachin Pavde become X factor against MLA Dr Pankaj Bhoir and Shekhar Shende
डॉ. सचिन पावडे ठरताहेत ‘ एक्स ‘ फॅक्टर, आघाडी व युतीस धास्ती.
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

गडकरींच्या Video मधील साधेपणा नेटकऱ्यांना भावला

हे ही वाचा<< नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”

अजिबात कुठलाही गाजावाजा नाही, कुठेही अतिरेक नाही, त्यांचा साधेपणाचा त्यांचा स्वतःवरील व आपल्या कामावरील विश्वास दाखवतो अशा कमेंट्ससह हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. निकालाची आकडेवारी पाहिल्यास काल गडकरी यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या संपताना त्यांना ६ लाख ५५ हजार २७ मते प्राप्त झाली होती. गडकरींनी १ लाख ३७ हजार ६०३ मतांनी काँग्रेसच्या विजय ठाकरे यांचा पराभव केला होता. मतदानाच्या वेळी सुद्धा गडकरींनी आपल्याला पाच लाखांहून अधिक मते मिळतील असा अंदाज वर्तवला होता.