भारताने १५ ऑगस्ट रोजी आपला ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. ध्वजारोहण सोहळा आणि देशभरातली उत्साही वातावरणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले दरम्यान केरळमधील ध्वजारोहण सोहळ्याचा एक व्हिडिओ तुफान चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये राष्ट्रीय ध्वज फडकवताना एका पक्ष्याने मदत केल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न आला की, खरचं पक्ष्याने राष्ट्रीय ध्वज फडकवताना मदत केली असेल का? तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे. व्हायरल व्हिडीओचे सत्य उघड झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक्स युजर शिल्पाने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्यादरम्यान काही लोक एकत्र येऊ तिरंगा फडकावताना दिसत आहे. मात्र, ध्वज खांबावर पोहोचताच काही क्षण अडकतो. तेवढ्यात तिथे एक पक्षी येतो आणि ध्वज फडकवतो आणि निघून जातो असे दिसते. ध्वज फडकताच फुलांच्या पाकळ्याही खाली पडताच.

“केरळ – राष्ट्रध्वज फडकवताना अडकला पण अचानक एक पक्षी आला आणि त्याने तो फडकवला!!” असे कॅप्शनही व्हिडीओसह शेअर केले आहे. १७ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या, व्हायरल व्हिडिओला ३ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. त्यावर प्रतिक्रिया देताना एका वापरकर्त्याने लिहिले, “पक्षी हा देशभक्तीचा पुनर्जन्म आत्मा असला पाहिजे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “हे पाहून खूप आनंद झाला. नुकतेच माझ्या मुलांना दाखवले आणि ते पाहून आनंद झाला.”

“तो एक सुंदर आणि प्रतीकात्मक क्षण वाटतो! अशा महत्त्वपूर्ण घटनेच्या वेळी मदतीसाठी निसर्गाने पाऊल उचलले हे जादुई वाटले असेल. हे असे क्षण आहेत जे समारंभांना अधिक संस्मरणीय बनवतात,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “आई गं…किती गोंडस!”, प्लास्टिकची बाटली वापरून आजी-आजोबांनी तयार केला कारंजा, Trending Video एकदा बघाच

“तो एक सुंदर आणि प्रतीकात्मक क्षण वाटतो! अशा महत्त्वपूर्ण घटनेच्या वेळी मदतीसाठी निसर्गाने पाऊल उचलले हे जादुई वाटले असेल. हे असे क्षण आहेत जे समारंभांना अधिक संस्मरणीय बनवतात,” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.

व्हिडिओ पाहिला तर कोणालाही वाटेल की खरंच पक्ष्यानेच ध्वज फडकवला पण हे सत्य नाही. ही सगळी कमाल कॅमेऱ्याच्या अँगलची आहे. हा व्हिडिओ जिथे उभे राहून शुट केला आहे तेथून पक्षी ज्या झाडावर बसला आहे ते दिसत नाही. व्हिडीओचे सत्य उघड करणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हा पक्षी ध्वजाजवळ न येता त्या मागे असलेल्या झाडाच्या फांदीवर बसतो आणि लगेच उडून जातो.

हेही वाचा – “काय खतरनाक आहे राव हा भाऊ!” बहि‍णींना ओवाळणी देण्यासाठी भावाने केलं भन्नाट नियोजन, Viral Photo पाहून पोट धरून हसाल

व्हिडिओने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून प्रशंसा मिळवल्यानंतर, पत्रकार मोहम्मद झुबेर यांनी स्पष्ट केले की,”हा तिरंगा फडकवणारा पक्षी नव्हता, तर कॅमेरा अँगलमुळे हा भ्रम निर्माण केला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No a bird didnt unfurl tricolour during independence day celebration in kerala heres what happened snk