राजकारणी नेत्यांना कोणत्या मंदिरात प्रवेश नाही असे होईल का? इकडे सामान्य भाविकांना दर्शनासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते पण नेत्याला मात्र काही मिनिटांत प्रवेश दिला जातो. त्यांच्यासाठी व्हिआयपी रांग असतेच. देवाच्या दारी सगळे समान असतात असे म्हणतात पण जेव्हा नेतेमंडळी दर्शनाला येतात तेव्हा याच समानतेच्या गोष्टी पायदळी तुडवल्या जातात. जवळपास सगळ्याच मोठमोठ्या मंदिरात तुम्हाला हे चित्र दिसेल. पण कानपूरमधले शनी देवांचे मंदिर यापेक्षाही वेगळे आहे. येथे राजकारणी लोकांना प्रवेश निषिद्ध आहे.

वाचा : १५ लाख बिअरच्या बाटल्यांपासून साकारला बौद्ध मठ

कानपूरमध्ये ‘भ्रष्ट तंत्र विनाशक शनि मंदिर’ आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या अक्षरात एक पाटी लावली आहे. येथे खासदार, आमदार, आयएएस, पीसीएस, न्यायाधीश यांना दर्शनास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. असे करण्याचे त्यांचे वेगळे कारणही आहे म्हणा. देशातील अनेक नेते भ्रष्टाचारी आहेत म्हणूनच त्यांना प्रवेश द्यायचा नाही असे ठरवले आहे. गंमतीचा भाग म्हणजे येथे शनीदेवांच्या मूर्ती समोर राजकारण्यांचे फोटो टांगण्यात आले आहेत. त्यामुळे यातल्या एकाने जरी भ्रष्टाचार केला तर शनी देवांची वक्र दृष्टी त्यांच्यावर पडले म्हणून अशी रचना करण्यात आली आहे.

वाचा : म्हणून येथे ‘त्या’ बुलेटची पूजा केली जाते

त्यातूनही कौतुकाची बाब म्हणजे या मंदिरात शनी देवांच्या मूर्तीवर तेल चढवण्याची मनाई करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता रौबी शर्मा याने या मंदिराची स्थापना केली आहे. सध्या तरी या मंदिरात राजकारणी नेत्यांना प्रवेश बंदी असली तरी पुढल्या २० वर्षांत जर देशातील परिस्थिती बदलली तर त्यांना प्रवेश देण्यात येईल असेही लिहिले आहे.

Story img Loader