अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जितके समर्थक आहे तितकेच त्यांचे विरोधकही आहे. ट्रम्प यांचे या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे म्हणजे अनेकांसाठी धक्काच होता. त्यामुळे त्यांच्या विजयानंतर अनेकांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. नवीन वर्षात ट्रम्प अधिकृतरित्या या पदावर विराजमान होतील. अशात एका हॉटेलने ट्रम्प यांच्या समर्थकांना आपल्या हॉटेलमध्ये येण्यास बंदी घातली आहे. हॉटेलच्या बाहेर त्यांनी तसा फलकच लावला आहे. ट्रम्प समर्थकांना या हॉटेलमध्ये जेवण मिळणार नाही अशी सूचना त्यांनी खिडकी बाहेर लावली आहे.
वाचा : या भारतीय हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये ‘ट्रम्प’ डोसा
हवाईमधल्या कॅफे ८ १/२ या हॉटेलने ज्यांनी अमेरिकन निवडणुकांमध्ये ट्रम्प यांना मत दिले आहे त्यांना जेवण न देण्याची भूमिका घेतली आहे. सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत या हॉटेल मालकाने सांगितले की ८ नोव्हेंबरपासूनच त्यांनी ही सूचना लावली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मत देऊन त्यांच्या समर्थकांनी अमेरिकेला अधोगतीकडे नेले आहे त्यामुळे त्यांना कॅफेमध्ये प्रवेश न देण्याचे मी ठरवले आहे. पण या हॉटेलमध्ये अनेक ट्रम्प समर्थक येतात असेही त्यांनी सांगितले. काही जण आपण ट्रम्प यांना मत दिले असे कबुल करतात पण जेवणाची मागणी केली तर आम्ही कोणतेही आढेवेढे न घेता त्यांना जेवण देतो असेही या मालकांनी सांगितले. ट्रम्प यांचा विजय झाला असला तरी अनेक अमेरिकन नागरिक ट्रम्प यांच्या विरोधात आहेत.
वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीसोबत विमानात गैरवर्तणुक