नोकरी करणाऱ्यांना त्यांचा संपुर्ण दिवस ऑफिसमध्येच घालवावा लागतो. त्यांच्यावर कामाचा ताण एवढा असतो की त्यांना स्वत:साठी वेळ काढणं अवघड होऊन जातं. शिवाय कामाच्या व्यापातून थोडा वेळ ब्रेक घेणं, मित्रांना भेटणं, त्यांच्याशी बोलणे यामुळे कामाचा तणावही जातो आणि काम करण्यासाठी नवी उर्जा मिळते, शिवाय मनही फ्रेश राहतं. आपल्या कर्मचाऱ्यांना काम करताना चांगलं आणि सकारात्मक वातावरण रहावं यासाठी ऑफिसमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. यामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमताही वाढते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, ऑफिसमधील काही वरिष्ठांना याच्याशी काही देणंघेणं नसतं, अशा गोष्टींचा त्याच्यावर काही फरक पडत नाही. त्यांना फक्त त्यांच्या नियमांची काळजी असते. आपले नियम कर्मचाऱ्यांवर कसे लादायचे एवढंच त्यांना माहिती असतं. त्यामुळे ऑफिसमध्ये एखादा बॉस असा असतोच, जो कर्मचाऱ्यांना दबावाखाली काम करायला भाग पाडतो. सध्या अशाच एका बॉसने केलेला अनोखा नियम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाहा- “मी इथे शिव्या ऐकायला…” विराट कोहलीवर नवीन उल हकचा आरोप? संघाला म्हणाला, “मी आयपीएल…”

डेली स्टार वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्यांने आपल्या ऑफिसमधील बॉसने जारी केलेल्या एका नियमाबद्दल सर्वांना सांगितलं आहे. हे नियम वाचल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले. या कर्मचाऱ्यांने त्याच्या कार्यालयात चिकटवलेल्या सूचनेचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याने लिहिलं, “मी जिथे काम केलं, ते सर्वात वाईट ठिकाण आहे, शिवाय तिथे पगारही कमी आहे.” त्याने पुढे लिहिलं, “जर तुम्हाला ऑफिसला यायला १ मिनिट उशीर झाला, तर तुम्हाला संध्याकाळी ६ नंतर १० मिनिटे जास्त काम करावे लागते” उदाहरणार्थ, जर तुम्ही १० वाजून २ मिनिटांनी ऑफिसमध्ये आला, तर तुम्ही ६ वाजून २० मिनिटांनीच ऑफिसमधून बाहेर जाऊ शकता.

हेही पाहा- लग्नातील फोटो पायाखाली तुडवले अन्…, नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर महिलेनं केलेलं फोटोशूट पाहून तुम्हीही थक्क व्हाल

नोटीसमध्ये बॉसने लिहिले आहे, “हे तुमचं कामाचं ठिकाण आहे. तुम्ही इथे कामासाठी येता, त्यामुळे तुमचा वेळ कामात घालवा, मैत्रीत आणि अनावश्यक गप्पा मारण्यात नव्हे. फोन नंबरची देवाण-घेवाण आणि कामाच्या वेळेत एकत्र बाहेर जाणं, हे सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर करा” यासोबतच नोटीसमध्ये कडक सूचना देताना बॉसने आपला नंबरही दिला आहे आणि सांगितले आहे की, कामादरम्यान कोणी फालतू बडबड करताना पकडलं तर या नंबरवर कळवा. ही नोटीस बघितल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्या कर्मचाऱ्याला आलेला राग साहजिक असल्याचं म्हटलं आहे. तर अनेकजण अशा बॉसच्या हाताखाली काम करायला कोणालाच आवडणार नसल्याचं म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No friendship no fun work is work not fun notice given by boss in office goes viral jap
Show comments