सध्या देशभरातील लोकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लोक घरातून बाहेर पडताना उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. कोणी गॉगल घालत आहे, तर कोणी छत्री घेऊन घराबाहेर जात आहे. पण सध्या मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील एक हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांचे मन हेलावले आहे. व्हायरल फोटोमध्ये एक महिला तिच्या तीन मुलांसह उन्हात उभी असल्याचं दिसत आहे. कडाक्याच्या उन्हापासून आपल्या मुलांचे सरंक्षण करण्यासाठी या महिलेकडे पैसे नसल्यामुळे तिने आपल्या मुलांच्या पायात प्लास्टिकची पिशव्या बांधल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाने त्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेबाबतचे वृत्त आजतक वेबसाईटने दिलं आहे
हा फोटो रविवार २१ मे रोजीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या फोटोतील महिलेचे रुक्मिणी असून तिच्यासोबत ३ लहान मुलं दिसत आहेत. ही महिला कडक उन्हात श्योपूर शहरातील रस्त्यांवर मुलांच्या पायात प्लास्टिकच्या पिशव्या बांधून फिरत होती. हे पाहून तेथून जाणाऱ्या स्थानिक पत्रकार इन्साफ कुरेशीने याने फोटो काढला होता जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटो व्हायरल झाल्यानंतर महिलेचा शोध घेतला असता तिचा पत्ता सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या घरी तिचा पती सूरजसह दोन मुली आढळून आल्या. तर रुक्मिणी तिचा एक वर्षाचा मुलगा मयंक याच्यासह राजस्थानमधील एका शहरात मजुरीसाठी गेली आहे. रुक्मिणीच्या नवऱ्याने त्याला टीबीचा आजार असल्याचे सांगितले. शिवाय आजारामुळे त्याला काम करणं जमत नाही, त्यामुळे फक्त रुक्मिणी कामावर जाते. आमच्याकडे रेशनकार्ड नाही, पण आधारकार्ड असल्याचंही नवऱ्याने सांगितलं.
हेही पाहा- “अगं माईक बंद कर तुझा…” मिटींगमध्ये महिलेचा विचित्र प्रताप; मॅनेजरने शेवटी मेसेज केला अन्…
जिल्हाधिकाऱ्यांचे मदतीचे आदेश –
याप्रकरणी श्योपूरचे जिल्हाधिकारी शिवम वम वर्मा म्हणाले, माझ्या निदर्शनास ही घटना आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका ममता व्यास आणि अंगणवाडी सेविका पिंकी जाटव यांना संबंधित कुटुंबाची माहिती गोळा करण्यासाठीच्या सुचना दिल्या आहेत. शिवाय या कुटुंबाला शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याच्या सूचना दिल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.