तुम्ही बिग बींचा ‘याराना’ चित्रपट पाहिला असेल ज्यात अमिताभ बच्चन यांनी ‘सारा जमाना हसीनो का दीवाना’ या लोकप्रिय गाण्यावर लाईट वाला ड्रेस घालून डान्स केला होता. ज्यानंतर लोकांमध्ये त्या ड्रेसची क्रेझ खूप वाढली, पण तुम्ही कधी विचार केला होता का की एक दिवस लाईट साडीतही फिट होईल? सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने लाईटवाली साडी घातली आहे. तेवढ्यात दुसरी महिला तिथे येते आणि ती साडी पाहते. हा क्षण एका पुरुषाने कॅमेऱ्यात कैद केला आणि दुसऱ्या महिलेला खोलीची लाईट बंद करण्यास सांगितले. त्यावेळी ही साडी आणखीच चमकत आहे. हा जुनाच व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

( हे ही वाचा: जर जगाची भूक माझ्या संपत्तीनं भागणार असेल तर मी टेस्ला विकायला तयार; एलन मस्क )

या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “तुझी दीपावली साडी आहे? मला खात्री आहे की तुमच्या या साडीशी कोणी बरोबरी करू शकत नाही …” एकाने कमेंट केली. तर दुसरा म्हणतो की, “#AmitabhBachchan #SaaraZamaanaHaseenonKaDeewana #yaarana नंतर असे काहीही पाहिले नाही!!” जुना व्हिडीओ शेअर करताना एका यूजरने ट्विट केले.

Story img Loader