धो धो कोसळणारा पाऊस अन् पावसात भिजत आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर डान्स करणे सारखा सुंदर क्षण दुसरा असू शकत नाही. सहसा अशा गोष्टी चित्रपटातमध्येच घडतात जिथे हिरो हिरोईन दोघही भरपावसामध्ये एकमेंकांबरोबर आनंदाने नाचत असतात. खऱ्या आयुष्यात अशा गोष्टी क्वचितच घडतात. पण एका तरुणाच्या आयुष्यात प्रत्यक्षात अशी घटना घडली पण मित्रांनी त्याच्याबरोबर जे केले त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. या घडनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून असे मित्र कोणालाही भेटू नये अशा भावना नेटकऱ्यांना व्यक्त केल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये सिंहगड इंस्टीट्युटच्या कार्निव्हलमधील आहे जिथे भर पावसामध्ये एक तरुण आणि तरुणी नाचताना दिसत आहे. तिथे उपस्थित तरुणाचे मित्रांना जे केले ते पाहून नेटकरी थक्क झाले आहे. मित्र-मैत्रिणी पावसात डान्स करत असताना तरुणाच्या मित्रांनी असे गाणे गायले ज्यामध्ये या परिस्थितीला वेगळेच वळण दिले आहे. तरुणाच्या मित्रांनी रोमँटिक गाणे गाण्याऐवजी “फुलो का तारो का सबका केहना है, एक हजारो मे मेरी बहेना है” हे गाणे गायले.
हेही वाचा –पुण्यात कशासाठी झाली आहे तरुणाची एवढी गर्दी? पाहा Video होतोय Viral
हेही वाचा – “जितके तुम्ही विरोधात तितके आम्ही….”; कारवरील पाटीची का होतेय एवढी चर्चा, पाहा Viral Video
व्हिडिओ पाहून अनेकांनी तरुणाच्या मित्रांच्या मस्करीची निंदा केली आहे. एकाने कमेंट केली , “बघा कसे जळत आहे लोकांची”
दुसऱ्याने कमेंट केली की, “त्यांचा सुंदर क्षण खराब केला”
हेही वाचा –“सर्वात सुंदर Video!” वडील आणि मुलीचं सुंदर नातं पाहून डोळ्यात येईल पाणी, पाहा हृदयस्पर्शी क्षण
तिसऱ्याने लिहिले की, “आयुष्यात तुमच्या समस्यांकडे असेच दुर्लक्ष करा जसे त्या तरुणांने आपल्या मित्रांकडे दुर्लक्ष्य केले आहे”
चौथ्याने कमेंट केली, “बाई हा काय प्रकार”
पाचव्याने कमेंट केली की, “जळके”