Optical Illusion IQ Test Viral Photo : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंनी अनेकांच्या मेंदुला आव्हान दिलं आहे. कारण हे फोटो माणसांच्या बुद्धीला कस लावण्यासाठी इंटरनेटवर व्हायरल होत असतात. दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे माणसांच्या बुद्धीला कधी कधी चालना मिळत नाही. पण त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी सुडोकू, ऑप्टिकल इल्यूजनसारखे फोटो फायदेशीर ठरतात. अनेक विचारांनी गुंतलेल्या माणसांना अशाप्रकारचे कोडे सोडवण्यासाठी मेंदूचा योग्य प्रकारे वापर करावा लागतो.
आताही असाच एक फोटो व्हायरल झाल्याने लोक गोंधळात सापडले आहेत. कारण या फोटोत दिसणारा ससा हा दुसराच प्राणी असल्याने सर्वांना बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. या फोटोत नक्की कोणता प्राणी किंवा पक्षी आहे, हे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त ५ सेकंदांचाच वेळ असणार आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आप्टिकल इल्यूजनच्या फोटोचं अचूक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.
फोटोत लपलेला पक्षी शोधण्यासाठी तुम्हाला दिलेली ५ सेकंदांची वेळ संपली आहे. परंतु, तुम्ही गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. कारण या फोटोचं अचूक उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी फोटोत लपलेला पक्षी ओळखला असेल, ती माणसं कमेंट बॉक्समध्ये त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतात. पण ज्यांना हा पक्षी शोधण्यात यश मिळालं नाही, अशा लोकांना आम्ही बरोबर उत्तर सांगणार आहोत. सर्वांनाच वाटलं असेल की, या फोटोत ससा आहे. पण तो ससा नाही. कारण तो एक बदक आहे. बदकाचा फोटो आडवा करून तुम्हाला अचूक उत्तर सांगण्याच आव्हान या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोच्या माध्यमातून दिलं आहे. ज्यांनी फोटो आडवा करून पाहिला असेल, त्यांना ऑप्टिक इल्यूजनच्या टेस्टमध्ये नक्कीच यश मिळालं असेल.
इथे पाहा फोटोत लपलेला पक्षी
