Kashmir Snowfall News : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये यावर्षी अद्याप बर्फवृष्टी झालेली नाही. स्कीइंगसाठी (Skiing) प्रसिद्ध असलेल्या गुलमर्गमध्ये अजूनही दुष्काळ आहे त्यामुळे तेथे भेट देणाऱ्या भारतीय आणि परदेशी पर्यटकांची निराशा होत आहे. बर्फाच्छादित खोऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्ग आणि पहलगाममध्ये बर्फ न पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरवर्षी साधारणपणे या ऋतूमध्ये गुलमर्ग बर्फाने झाकलेला असतो. पण यंदा मात्र गुलमर्ग शहर कोरडे पडले आहे. जागतिक तापमानवाढीमुळे भारताच्या हिवाळ्यावर परिणाम झाला आहे.

गुलमर्गसह हिमाचल, पहलगाम आणि उत्तराखंडमध्येही पडला नाही बर्फ

न्यूज एजन्सी एएनआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये गुलमर्ग हे प्रसिद्ध नयनरम्य शहर ओसाड आणि कोरडे पडल्याचे दिसत आहे आणि जमिनीवर फक्त काही बर्फाचे तुकडे दिसत आहेत. केवळ गुलमर्गच नाही तर काश्मीरमधील पहलगामसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी बर्फवृष्टी झाली आहे.

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या लक्षद्वीपला कसे पोहचायचे? केव्हा द्यावी भेट? प्रवासासाठी किती येईल खर्च?

लॉन्ग ड्राय म्हणजे जेव्हा दीर्घ कालावधीसाठी बर्फवृष्टी होत नाही. दरवर्षी याठिकाणी साधारणपणे या काळात ४ ते ६ फूट जाडसर बर्फाची चादर येथे पसरल्याचे दिसते. गेल्या वर्षीच्या गुलमर्गच्या फोटोमध्ये बर्फाच्या दाट चादरीने जमीन झाकलेली आहे आणि जमिनीचा एक इंच भागही कोरडा दिसत नाही. मात्र यंदा जमिनीवर बर्फ नसल्याने हा परिसर कोरडाच दिसत आहे.

गुलमर्गमध्ये कोरडा हिवाळा का सुरू आहे? (Why is Gulmarg experiencing a dry winter?)

हवामान खात्याने सांगितले,की या हिवाळ्यात कोरड्या वातावरणामुळे शहरात कोरडे पडल्याचे दिसून येत आहे आणि काश्मीर खोऱ्यात पावसात ७९ % घट झाली आणि क्वचितच बर्फवृष्टी झाली.

काश्मीर हवामान विभागाचे संचालक मुख्तार अहमद यांनी एएनआयला सांगितले की, “संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीचा पहिला आठवडा कोरडा गेला आहे. येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता नाही. १६ जानेवारीच्या दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. “अल निनो नोव्हेंबरपासून चालू आहे आणि पुढील महिन्यापर्यंत सुरू राहू शकेल.”

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील महिन्यापर्यंत कोरडे हवामान कायम राहणार असल्याने तातडीने दिलासा मिळण्याची शक्यता नाही. हवामान खाते कमी हिमवृष्टी न होण्याचे कारण सध्या चालू असलेल्या एल निनो हवामानाला देत आहे, ज्यामुळे २०२३ हे रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. एल निनो प्रभाव, समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानवाढीद्वारे दर्शविला जातो ज्यामुळे जागतिक हवामान पद्धतींमध्ये व्यत्यय (global weather patterns) येऊ शकतो. हवामानाच्या घटनेमुळे २०२४ मध्येही उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

Explore Indian Islands : आता मालदीव विसरा! लक्षद्वीपसह भारतातील ‘या’ सुंदर बेटांना द्या भेट!

भारतीय हवामान खात्याने असेही म्हटले आहे की,” पश्चिमी चक्रावात (Western Disturbances) नसल्यामुळे उंचावर हिमवर्षाव होतो आणि मैदानी भागात पाऊस पडतो, परिणामी आतापर्यंत कोणतीही मोठी बर्फवृष्टी झाली नाही. ही स्थिती या महिन्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

स्कायमेट वेदरचे (Skymet Weather) उपाध्यक्ष महेश पलावत यांनी एनडीटीव्हीला सांगितले होते की, “यंदा भारतात हिवाळा उशीरा सुरू होईल आणि अल्प कालावधीसाठी हिवाळा असेल.

“सामान्यतः, पश्चिमी चक्रावात (Western Disturbances)ऑक्टोबरच्या आसपास सुरू होतात आणि वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत जोरदार बर्फवृष्टी आणि उत्तरेकडे तीव्र हिवाळा दिसून येतो. आता, हे पश्चिमी चक्रावात (Western Disturbances) कमकुवत होत आहे आणि बर्फवृष्टी कमी होत आहे. दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी, थंडी कमी होत चालली आहे. ” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – – तब्बल २० मिनिटे विमानाबाहेर लटकत होता पायलट, तरीही वाचला त्याचा जीव! थरारक अपघाताचा किस्सा व्हायरल

पश्चिमी चक्रावात म्हणजे काय? (What is Western Disturbances?)

भूमध्य समुद्रात (Mediterranean region) निर्माण होणाऱ्या वादळास पश्चिमी चक्रावात अर्थात Western Disturbances म्हणतात. मान्सूनपेक्षा हे पूर्णपणे वेगळे आहे. भूमध्य समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होते, या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते. वाऱ्याची दिशा ज्या बाजूला वाहू लागते, त्या दिशेला आर्द्रतायुक्त हवा वाहू लागते. पश्चिमी चक्रावात हे पुन्हा पुन्हा येऊ शकतात किंवा दोन चक्रावातमधील अंतर कधी जास्त तर कधी कमी असते.

पर्यटनावर होतोय परिणाम (Tourism affected)

हिमालयीन शहराची अर्थव्यवस्था मुख्यत्वे पर्यटकांवर अवलंबून आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत बर्फात खेळण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यट या शहरांना भेट देतात. पण यंजा जमिनीवर बर्फ नसल्यामुळे पर्यटकांनी गुलमर्गच्या सहली रद्द करण्यास सुरुवात केली आहे. “गेल्या वर्षी या पर्यटक शहरामध्ये सर्वाधिक १.६५ ‘दशलक्ष लोकांची नोंद झाली होती.”

२ फेब्रुवारीपासून होणार्‍या खेलो इंडिया हिवाळी खेळांवरही कमी हिमवर्षावाचा परिणाम होऊ शकतो.

“हे यापुढे सुरू राहिल्यास, सामाजिक-आर्थिक घडामोडींवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. जर पुरेसा बर्फ मिळत नसेल, तर पाणी मिळत नसेल, तर त्याचा शेतीवर, तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि पर्यायाने तुमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल,” असे ग्लेशियोलॉजिस्ट आणि हिमालयन संशोधक ए.एन. दिमरी यांनी  PTIला सांगितले.