आजकाल बॉलिवूड स्टार्सच्या डुप्लिकेट्सची जोरदार चर्चा आहे. दररोज फिल्म स्टार्सचे नवे-नवे डुप्लिकेट्स समोर येत आहेत. आता सौंदर्याची खाण समजली जाणारी दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सारखी दिसणारी आणखी एक तरुणी समोर आली आहे. या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसणाऱ्या तरुणीला पाहून प्रत्येक जण थक्क होताना दिसत आहे.
सेलिब्रिटींचे डोपलगँगर्स शोधण्याच्या बाबतीत इंटरनेट ही सोन्याची खाण आहे. गेल्या वर्षी ऐश्वर्याची डुप्लिकेट पाकिस्तानी आमना इमरान हिला नेटकऱ्यांनी शोधून काढलं होतं. ऐश्वर्या राय अभिनीत चित्रपटांच्या संवादांशी तिचे लिप सिंक करणारे अनेक व्हिडीओ त्यावेळी प्रचंड व्हायरल झाले होते. आता आणखी नवी डुप्लिकेट नेटकऱ्यांना सापडली आहे. आशिता सिंग असं या तरूणीचं नाव आहे आणि आता ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. आशिताने तिचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि रातोरात ती सोशल मीडियावरील स्टार बनली आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”
या व्हायरल व्हिडीओमध्ये आशिता एका ट्रेंडिंग ऑडिओमध्ये लिप-सिंक करताना दिसत आहे. तिची अदाकारी पाहून सुरूवातीला तुम्हाला काही काळासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय आहे असा भास होतो. पण ती ऐश्वर्या राय नसून तिची डुप्लिकेट आहे. हुबेहूब ऐश्वर्यासाराखी दिसणाऱ्या या तरूणीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ऐश्वर्याप्रमाणेच आशिताचे डोळे निळे आहेत. ऐश्वर्या राय आणि आशिताचे विचित्र साम्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
आणखी वाचा : अॅमेझॉनचे शेकडो पॅकेज रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेकून देऊ लागले, हा VIRAL VIDEO एकदा पाहा!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : फ्लाइट अटेंडंटने रडणाऱ्या लहान मुलाला शांत केलं…बाळाचा गोंडस VIDEO VIRAL
आशिताचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला २४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. आशिता ही एक कलाकार असून तिच्या इन्स्टाग्रामवर २ लाख ४३ हजार इतके फॉलोअर्स आहेत. तिच्या या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. काहींनी तिला ‘देसी ऐश्वर्या राय’ म्हटलंय. तर काहींनी ती ऐश्वर्या रायच असल्याचं सांगितलंय. काही नेटकरी मात्र पुरते गोंधळून गेले आहेत.