Fact check : शिख फॉर जस्टिसचे संस्थापक आणि खलिस्तानी नेते गुरपतवंत सिंग पन्नूने भारताला फसवण्यासाठी स्वतःवर हल्ला केल्याचे सांगत, द वॉशिंग्टन पोस्टच्या नावाने कथित लेखाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. पण प्रत्यक्षात तो स्क्रिनशॉट खोटा असल्याचे उघड झाले आहे. काय आहे या व्हायरल पोस्टचे सत्य, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या…

काय आहे लेखात?

लेखाचे शीर्षक होते: अमेरिकेच्या भूमीवरील हत्येचा कट एक गडद बाजू उघड करते: पन्नूने भारताला गोवण्यासाठी स्वतःवर हल्ला केला असावा” (An Assassination plot on US soil reveals a dark side: Pannun may have staged attack on himself to implicate India)

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
AI-generated video falsely claims Taylor Swift said wildfires are God's revenge for Gaza
“अमेरिकेतील आग ही गाझावरील हल्ल्यासाठी देवाने दिलेली शिक्षा”; टेलर स्विफ्टचे धक्कादायक विधान? पण खरं काय, वाचा
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Image Of Mark Zuckerberg
Mark Zuckerberg : मार्क झुकरबर्ग यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप, मेटाच्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच

स्क्रीनशॉटनुसार लेखात पुढे असे सांगितले आहे की,” अमेरिकन सरकारमध्ये बारकाईने तयार केलेल्या अहवालांमध्ये यूएस गुप्तचर संस्थांनी असे मूल्यांकन केले आहे की,”पन्नूने हा हल्ला स्वतः केला असावा. वर्षभर तपास करूनही, भारतीयांच्या सहभागाचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. तरीही या हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याचा निष्कर्ष. गुरपतवंत सिंग पन्नूने हे खलिस्तान चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला तपासादरम्यान आढळले की,”व्हायरल स्क्रीनशॉट हा एडीट केलेला आहे.

काय होत आहे व्हायरल?

X युजर Arun Pudur ने स्क्रीनशॉट आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

https://archive.ph/WzTH7

इतर वापरकर्ते देखील हा स्क्रीनशॉट शेअर करत आहेत.

हेही वाचा –बांगलादेशात खरंच हिंदूंच्या घरावर हल्ला अन् तोडफोड करण्यात आली? Viral Video नेमका कुठला? जाणून घ्या सत्य

तपास काय सांगतो?

स्क्रिनशॉटमधील लेखात इंग्रजी व्याकरणाच्या अनेक चुका लक्षात येत आहे, ज्यावरून स्पष्ट होत आहे की, वॉशिंग्टन पोस्टमध्ये इतक्या त्रुटींसह लेख प्रकाशित केला जाऊ शकत नाही.

त्यानंतर लेखाचे शीर्षक गूगल कीवर्ड सर्च केले त्यानंतर एक लेख सापडला ज्यामध्येशीर्षक तेच होते पण माहिती पूर्णपणे भिन्न असल्याचे दिसले.

https://www.washingtonpost.com/world/2024/04/29/india-assassination-raw-sikhs-modi/

लेखातेचे शीर्षक होते: An assassination plot on American soil reveals a darker side of Modi’s India

बातमी पूर्णतः वेगळी होती.

हेही वाचा – video : कोलकाता बलात्कार-हत्येची घटना डॉक्टरांमुळे झाली उघड? पीडितेचा मृतदेह नेणारी गाडी रोखली? वाचा सत्य

व्हायरल फोटोत दाखवल्याप्रमाणे पहिला परिच्छेद वेगळा होता, मूळ लेखात नमूद केले आहे: महासत्ता आणि संभाव्य भागीदार असलेल्या चीनशी संबंध दृढ करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य दौऱ्यावर स्वागत करण्यासाठी व्हाईट हाऊसने गेल्या वर्षी विलक्षण परिश्रम घेतले.

लेखात X वर वॉशिंग्टन पोस्ट इंडियाचे ब्यूरो चीफ गॅरी शिह यांची पोस्ट देखील आढळली.

त्याने पुष्टी केली की, व्हायरल झालेला लेख वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केलेला नाही आणि ते फोटोशॉप केलेले फोटो आहे.

निष्कर्ष: द वॉशिंग्टन पोस्टच्या संपादित लेखाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे ज्यामध्ये गुरपतवंत सिंग पन्नू यांनी भारताला अडकवण्यासाठी स्वतःवर हल्ला केल्याचा खोटा दावा केला आहे. स्क्रीनशॉट बनावट आहे.

Story img Loader