राजस्थानच्या कोटामधील सर्वात मोठ्या हॉस्पिटमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे. एका वकिल व्हिलचेअर मिळेना म्हणून इतका संतापला की आपल्या मुलाला घेऊन तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तो थेट स्कुटर घेऊन आला. हॉस्पिटलमध्ये स्कुटर पाहून कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सर्वांनाच धक्का बसला. सर्व प्रकार समजताच हॉस्पिटलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हॉस्पिटची ही अवस्था पाहून विभागीय आयुक्तांना नाराजी व्यक्त केली.

यासंदर्भात आपल्या मुलाला स्कूटरने तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाणाऱ्या वकील मनोज जैन यांनी सांगितले की, माझ्या मुलाला फ्रॅक्चर झाले आहे, त्याचे वजनही जास्त आहे, त्यामुळे मी त्याला तिसऱ्या मजल्यावर घेऊन जाऊ शकत नव्हतो. तेथे उपस्थित कर्मचार्‍यांना विचारले की, माझ्याकडे इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याचा आवाजही येत नाही, मी आणू का? त्यावर तेथे उपस्थित कर्मचारी सुखलाल म्हणाले आणा, मगच मी आणले, मात्र देवकी नंदन यांनी माझ्या गाडीची चावी काढून घेतली.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हेही वाचा – हृदयद्रावक! चार हात, चार पाय, दोन हृदयं आणि एक डोकं असलेल्या बाळाचा जन्मानंतर २० मिनिटांनी मृत्यू

पोलिसांनी प्रकरण शांत केले

वकील मनोज जैन यांनी प्रथम तळमजल्यावरून तिसर्‍या मजल्यावर लिफ्टमधून स्कूटर नेली, नंतर मुलाला बसवले आणि लिफ्टच्या मदतीने परत आणले. मात्र त्यांना खाली थांबवण्यात आल्यावर एकच गोंधळ उडाला. यादरम्यान पोलीसही घटनास्थळी पोहोचले, त्यांनी प्रकरण शांत केले. यावरून वकील आणि कर्मचारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.

कर्मचाऱ्यांच्या परवानगीने स्कूटर आणली – वकील मनोज जैन

या प्रकरणात वकील मनोज यांनी सांगितले की, जेव्हा मला व्हीलचेअर मिळाली नाही तेव्हा मी सुखलाल आणि मुकेश यांची परवानगी घेतली, त्यानंतरच मी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आलो. या लोकांनी ते सीसीटीव्हीही पाहिले आहेज्यात मी त्यांच्या परवानगी घेऊनच आत गेलो होतो. मनोज जैन म्हणाले की, ”रूग्णालयात व्यवस्था नसेल तर सामान्य माणूस काय करणार? ”

हेही वाचा – एआयने तयार केला आनंद महिंद्रांचा फोटो, स्वत:ला पाहून म्हणाले, ‘आपलं भविष्य…’

काय म्हणाले रुग्णालय प्रशासन?

रुग्णालयाचे उपअधीक्षक डॉ. कर्णेश गोयल यांनी याबाबत सांगितले की, ही बाब माझ्या निदर्शनास आली, मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलच्या बाहेरपर्यंत स्कूटी आणण्यास सांगितले होते. वरच्या मजल्यावर नेण्यास सांगितले नाही. व्हीलचेअरसाठी आम्ही सरकारला पत्र दिले आहे, सध्या सप्लायमध्ये व्हीलचेअर नाही, पण स्कूटर घेऊन जाणे चुकीचे आहे. इतर रुग्णही आम्ही आमची गाड्या घेऊन येऊ असे सांगत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ‘रुग्णालयात स्कूटर आणण्यास परवानगी नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.