शाळेत असताना वर्गात दंगा करणाऱ्या, अभ्यास न करणाऱ्या मुलांनी शिक्षक वर्गाबाहेर तासभर उभे राहण्याची शिक्षा देत असे पण कर्मचाऱ्यांनी अशी शिक्षा केल्याचे कधी ऐकले आहे का? नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना उभे राहण्याची शिक्षा दिली आहे. सर्वजण मान खाली घालून उभे असल्याचे दिसते पण ही शिक्षा त्यांना का देण्यात आले हे माहिती आहे का? न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (नोएडा) चे सीईओ डॉ लोकेश एम यांनी १६ कर्मचाऱ्यांना सुमारे ३० मिनिटे उभे राहण्याची शिक्षा दिली कारण त्यांनी एका वृद्ध जोडप्याला बराच वेळ ताटकळत उभे केले होते.
नक्की काय घडले?
सीईओ, डॉ लोकेश एम, २००५च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी २०२३ मध्ये नोएडाचा कार्यभार स्वीकारला. न्यू ओखला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (नोएडा) कार्यालयात स्थापित केलेल्या सुमारे ६५ कॅमेऱ्यांच्या फुटेजचे वारंवार तपासतात. अहवालानुसार, डॉ लोकेश कर्मचाऱ्यांना सूचना देतात की,”लोकांना, विशेषत: कार्यालयात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जास्त तास प्रतीक्षा करायला लावू नका.
वृद्ध व्यक्तीला बराच वेळ काम पूर्ण होण्यासाठी पाहावी लागली वाट
सोमवारी, सीईओच्या काउंटरवर एक वृद्ध व्यक्ती उभा असल्याचे दिसले. त्याने काउंटरवरील महिला अधिकाऱ्याला विलंब न लावता त्या पुरुषाला मदत करण्याची आणि त्याची विनंती पूर्ण होऊ न शकल्यास त्याला स्पष्टपणे कळवण्याची सूचना केली.
सुमारे २० मिनिटांनंतर, सीईओच्या लक्षात आले की,”वृद्ध माणूस अजूनही त्याच काउंटरवर उभा आहे. त्यामुळे वैतागलेल्या डॉ.लोकेश यांनी काउंटरवरील सर्व अधिकाऱ्यांना खडसावले.”
त्यानंतर सीईओने अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून ३० मिनिटे उभे राहून काम करण्याचे आदेश दिले. या घटनेचा एक व्हिडिओ, जो आता व्हायरल झाला आहे, त्यात महिला कर्मचाऱ्यांसह अधिकारी सीईओच्या निर्देशानंतर उभे राहून काम करताना दिसत आहेत.
नोएडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शिक्षा देताना सीईओ डॉ लोकेश म्हणाले, “जेव्हा तुम्ही उभे राहून काम कराल, तेव्हाच तुम्हाला वृद्धांना होणाऱ्या अडचणी समजतील.”
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सीईओच्या कृतीची प्रशंसा केली आहे, असे सांगून की.” सरकारी कार्यालयांमध्ये वेळेवर प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी असे उपाय आवश्यक आहेत.”